AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो, दिवाळी खरेदीपूर्वी हे वाचाच! ड्रोन आणि फ्लाइंग कंदीलबद्दल नवा नियम काय ?

दिवाळीच्या उत्साहात मुंबईत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले आहेत. पोलिसांनी ड्रोन आणि फ्लाइंग कंदील उडवण्यास तसेच विकण्यास बंदी घातली आहे. आग, घातपात व शांतताभंग टाळण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई करण्यात येईल. सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन.

मुंबईकरांनो, दिवाळी खरेदीपूर्वी हे वाचाच! ड्रोन आणि फ्लाइंग कंदीलबद्दल नवा नियम काय ?
ड्रोन आणि फ्लाइंग कंदीलबद्दल नवा नियम
| Edited By: | Updated on: Oct 08, 2025 | 6:06 PM
Share

नवरात्र सरली, दसरा साजरा झाला आणि आता देशभरातील नागरिकांसह महाराष्ट्र, मुंबईकरांनाही दिवाळीचे वेध लागले आहेत. अवघ्या 2 आठवड्यांवर आलेल्या या सणासाठी घराघरांतून जोरदार तयारी सुरू झाली असून साफसाफई, सजावट, फराळ, मिठाईसाठी सगळेच सज्ज झाले आहेत. दिवाळी सण मोठा नाही आनंदा तोटा.. असं आपल्याकडे म्हटलं जातं आणि ते खरंही आहे. दिवाळीत छान कपडे घालून, मिठाई फराळाचा आस्वाद घएत नातेवाईक, मित्र-मैत्रिणींची भेट घेण्याचे अनेकांचे प्लान्स असतात. या सणआमुळे मुंबईलाही एक वेगळीच झळाळी मिळते, रस्ते पणतीच्या प्रकाशाने, कंदीलांमुळे, फटाक्यांमुळे उजळून निघालेले असतात.

सर्वच मुंबईकतर या सणासाठी उत्सुक आहेत, मात्र दिवाळी येण्यापूर्वी शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पालिका व पोलीस यंत्रेतर्फे महत्वाचे नियम लागू करण्यात आले आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ड्रोन व फ्लाइंग कंदील उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि शांतताभंग होऊ नये यासाठी पोलिसांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन व फ्लाइंग कंदील उडविण्यास आणि विकण्यास बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 अन्वये कारवाई करण्यात येणार आहे

आग, घातपात टाळण्यासाठी उचललं मोठं पाऊल

मुंबई शहर व उपनगरात दिवाळीत फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतीषबाजी करण्यात येते, तसेच आजकाल ड्रोन आणि फ्लाइंग कंदील उडविण्याचे प्रकार सर्रास वाढले असून अनेकजण ड्रोन व कंदील उडवताना दिसतात. मात्र याचमुळे अनेकदा आगीची व मोठा घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अनेक नामांकित व्यक्तींना हवाई यंत्रांद्वारे लक्ष्यही केले जाऊ शकते.

त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी 7 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरदरम्यान ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायको-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलून आदींच्या उड्डाण क्रियांना म्हणजेच आकाशात उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. यादरम्यान, मुंबई पोलीसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस उप आयुक्त (अभियान), बृहन्मुंबई यांच्या लेखी विशिष्ट परवानगीने करण्यात येणारी कारवाई अपवाद राहील. दरम्यान, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत 12 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2025 या 30 दिवसांत फ्लाइंग कंदील उडविण्यास पूर्णतः बंदी असणार आहे. एवढंच नव्हे तर फ्लाईंग कंदीलचा साठा करण्यास व विक्री करण्यासही परवानगी नाही.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.