AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS Vs Shiv sena | शिवसेनेच्या टिझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेची गर्दी! सोशल मीडियावर जोरदार चर्चा, अखेर शिवसेनेनं व्हिडीओ हटवला

कोण असली आणि कोण नकली, याचा निर्णय आता जनतेनंच घ्यावा, असंही मनसेनं म्हटलंय. मनसेचा हा दावा खरा निघाला तर उद्धव ठाकरेंवर मोठी नामुष्की ओढवू शकते. 

MNS Vs Shiv sena | शिवसेनेच्या टिझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेची गर्दी! सोशल मीडियावर जोरदार चर्चा, अखेर शिवसेनेनं व्हिडीओ हटवला
| Edited By: | Updated on: May 11, 2022 | 9:17 PM
Share

मुंबईः हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला (Shiv Sena) बॅकफूटवर टाकण्याचा विडाच जणू मनसेनं (MNS) उचचला आहे. हनुमान चालिसा, मशिदींबाहेरचे भोंगे, अयोध्या दौरा या मुद्द्यावरून राज ठाकरेंच्या सभा चांगल्याच गाजत आहेत. त्यामुळे शिवसेनेनंही आता भव्य सभा आयोजित केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं येत्या 14 मे रोजी बीकेसीवर जंगी सभा आयोजित केली आहे. पक्षातर्फे या सभेसाठीचे टिझरही जारी करण्यात आले आहेत. पहिला टिझर काही दिवसांपूर्वी जारी झाला. आज या सभेचा जो दुसरा टिझर जारी झाला, त्यात मात्र शिवसेनेनं मोठी चोरी केल्याचा आरोप मनसेनं केला आहे. या टिझरमध्ये दिसणारी गर्दी ही राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवाजी पार्कमधील सभेची गर्दी असल्याचा दावा मनसेनं केला आहे. शिवसेनेच्या ट्विटर अकाउंटवर हे टिझर जारी झाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी टीकेच झोड उठवली. त्यानंतर शिवसेनेच्या अकाउंटवरून हे टिझर काढून टाकण्यात आलं. मात्र अनेक कार्यकर्त्यांच्या अकाउंटवर ते होतंच. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. तसेच कोण असली आणि कोण नकली, याचा निर्णय आता जनतेनंच घ्यावा, असंही मनसेनं म्हटलंय. दरम्यान, सोशल मीडियावरुन जोरदार खिल्ली उडवली जाऊ लागल्यावर शिवसेनेनं तो व्हिडीओ डिलीट केलाय. मात्र, अनेकांनी तो व्हिडीओ आधीच डाऊनलोड केल्यानं शिवसेनेची चांगलीच पंचाईत झालीय.

मनसेचा आरोप काय?

राज ठाकरे यांचा हिंदुत्वाचा कळवळा नकली असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. तसेच असली हिंदुहृदय सम्राट यांची सभा येत्या काळात होईल, असे पोस्टरही शिवसेनेच्या वतीने झळकवण्यात आले. मात्र शिवसेनेनं जारी केलेल्या टिझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेची गर्दी दाखवल्याचा आरोप मनसेनं केला आहे. तसेच असली नकली म्हणणाऱ्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करा. काहीतरी अस्सल तुमचे असू द्या. इतकेही नकली होऊ नका. सभा शिवसेनेची आणि व्हिडिओत गर्दी मनसेच्या सभेची.. अजून माणसं जमा करायला राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतोय का? लक्षात आल्यावर ट्विट डिलिट करण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढवली असल्याची खोचक टीका मनसेनं केली आहे.

व्हिडिओत नेमके काय?

शिवसेनेनं जारी केलेल्या टिझरमध्ये भव्य सभा दाखवण्यात आली आहे. बॅगराऊंडला … जमलेल्या माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो.. असे जनतेला आवाहन कऱण्यात आले आहे. त्यानंतर भव्य गर्दीतून उद्धव ठाकरे सभेसाठी येताना दाखवले आहे. यानंतर सभेच्या ठिकाणची दोन-तीन भव्य दृश्य दाखवली आहेत. याच दृश्यांपैकी एक मनसेच्या शिवाजी पार्कमधील गर्दी असल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे. तसेच टिझरमध्ये पुढे उद्धव ठाकरे, यांनी प्रत्येक गावात, खेड्यात, घरात शिवसैनिक असलाच पाहिजे, असं आवाहनही केलं आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.