इतका हतबल मुख्यमंत्री कधीच पाहिला नव्हता; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. माणिकराव कोकाटे यांचे थेट खाते बदलण्याची वेळ फडणवीस सरकारवर आली आहे. मात्र, कोकाटे यांना दिलेल्या क्रीडा खात्यावरूनही टीका होऊ लागली आहे, असे त्यांनी म्हटले.

नुकताच उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केलीये. अनेकजण शिवसेना संपवायला निघाले. उद्धव ठाकरे संपवायला निघाले. एवढं करून ठाकरे संपत का नाही. सर्वच माणसं पैशाने विकले जात नाही. गद्दार विकले जात असतील पण निष्ठावंत विकले जात नाही. शिवसेनाप्रमुखांपासूनचे शिवसैनिक माझ्यासोबत आहे. अरविंद सावंतही सोबत आहे. केंद्रीय मंत्रीही झाले. ही साधी माणसं आहेत. काही मोठी केलेली माणसं गेली. पण ज्यांनी मोठं केलं ती माणसं माझ्यासोबत आहे. आयुष्यात काय करायचं. कशासाठी येता. शेतकरी संघटनेचं अस्तित्व होतं. तुम्ही असं काय पाहिलं की तुम्ही संघटना विलीन करता. आयुष्यात सर्व होतं. पण प्रामाणिकपणा विकत घेतला जाऊ शकत नाही. मुख्यमंत्री म्हणून माझ्यावेळी नागपूरला एक अधिवेशन झालं. कोणत्याही शेतकऱ्याने कर्जमुक्ती मागितली नव्हती. मला वाटलं संधी मिळाली. शेतकऱ्यांचं आपण देणं लागतो, या भावनेतून मी कर्जमुक्ती दिली, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
तुम्ही बुलढाण्याचे अमरावतीचे कार्यकर्ते येतील. निवडणुकीत जे घडलं ते अनाकलनीय आहे. असा निकाल लागेल असं वाटलं नव्हतं. राज्यातील लोक उफराटे नाही. काही तरी गडबड घोटाळा झाला आहे. आता ते घोटाळे बाहेर येत आहेत. लाडक्या बहिणीत किती बापे घुसले. कुणी घुसवले. निधी वळवला जातो. लाडक्या बहिणींचीही इन्कमटॅक्सची चौकशी होणार असं ऐकलं. काही लोक भुलले असतील. आता त्यांचं खरं स्वरुप बाहेर पडलं. अकोला बुलढाण्यात ट्रॅक्टर मोर्चा काढला होता.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, पुराव्यानिशी आपण भ्रष्टाचाराची प्रकरणे दिली. आपल्याला वाटलं आरोप केला तर चौकशी होईल. आपलं सरकार असताना आरोप केल्यावर राजीनामा मागायचे. फडणवीस यांनी नीतीमूल्य समिती स्थापन केली होती. ती समिती गेली कुठे. राजीनामा घेण्याऐवजी समज दिली. धुळ्याच्या रेस्टहाऊसमध्ये पकडलेली रकम त्याची चौकशी खोळंबली. बॅगा घेऊन बसलेल्यांची चौकशी नाही. कदाचित रमी आणि तीन पत्तीला आता ऑलिम्पिकला मागणी होईल. जे खातं ज्यांचं आहे, त्यांना खातं दिलं असेल. कृषी खातं त्यांचं नव्हतं. रमी खेळणारा माणूस क्रीडा मंत्री झाला. यांचे चेहरे उघडे पाडले पाहिजे. आंदोलनाची गरज आली आहे.
राज्यात लवकरच आंदोलन करणार आहोत. त्याविरोधात सर्वांनी लढलं पाहिजे. एवढे हतबल मुख्यमंत्री मी पाहिले नव्हते. हतबल. कुणी कुणाला जाब विचारायचा नाही. कुणाकडून तरी त्रास द्यायचा आणि मग त्यांच्याकडे गेल्यावर मिटवून टाकायचं आणि मी तुमचा कैवारी आहे, असं दाखवलं जातं. जनतेचा कुणी वाली नाहीये. मुुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवत उद्धव ठाकरे म्हणाले की, इतका हतबल मुख्यमंत्री कधीच पाहिला नव्हता. राज्यातील अनेक मंत्री वादात सापडले आहेत. त्यामुळे सरकारला अडचणींचा सामना करावा लागत आहे.
यापैकीच एक माणिकराव कोकाटे यांचं थेट खातं बदलण्याची वेळ फडणवीस सरकारवर आली आहे. मात्र, कोकाटे यांना दिलेल्या क्रीडा खात्यावरूनही टीका होऊ लागली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फडणवीस यांच्या या निर्णयावर टीका केली आहे. तसेच वाचाळवीर मंत्र्यांवरूनही राज्य सरकारला घेरलं आहे. यापूर्वी मी इतका हतबल मुख्यमंत्री कधीच पाहिला नव्हता, अशी टीकाच उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शेतकरी क्रांती संघटनेचे पदाधिकारी आज मातोश्रीत आले होते. याप्रसंगी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी क्रांती संघटना शिवसेनेत विलीन करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
.
