बस वाहक- बस चालक तसेच 7-8 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या प्रवाशांवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सूरु आहेत. (7-8 passengers including driver seriously injured in 'Tejaswini bus' accident in Dadar)
Oct 27, 2021 | 12:47 PM
आज मुंबईतील दादर परिसरात तेजस्विनी बसचा खूप मोठा अपघात झाला आहे. ही बस मरोळ आगाराची असल्याची माहिती आहे.
1 / 5
मरोळ आगाराच्या क्र. 22 नंबर बसची अपघातानंतरची परिस्थिती अतिशय बिकट असल्याचं दिसलं आहे. सुदैवानं या अपघातात जिवितहानी झालेली नाही.
2 / 5
मात्र प्राथमिक माहितीनुसार बस वाहक- बस चालक तसेच 7-8 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या प्रवाशांवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सूरु आहेत.
3 / 5
बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष श्री सुहास सामंत, नगरसेवक आणि बेस्ट समिती सदस्य श्री अनिल कोकीळ, नगरसेवक प्रभाग समिती अध्यक्ष श्री रामदास कांबळे 4 वाजता सायन हॉस्पिटलमध्ये जखमी प्रवाशांची भेट घेणार आहेत.
4 / 5
ट्रक आणि बसची भयानक धडक झाल्यानं हा अपघात झाला आहे.