Video: मतदारांच्या आधी केंद्रावर सापच पोहोचला! चेंबूरमध्ये नेमकं काय घडलं?
Viral Video: मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाच्या तयारीदरम्यान चेंबूर परिसरातील एका मतदान केंद्रावर विषारी साप आढळून आल्याने कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

आज संपूर्ण राज्यात सकाळी आठ वाजल्यापासून महानगरपालिका निवडणूकीसाठी सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मतदरांची गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मतदान केंद्रावर मतदरांआधी विषायी साप पोहोचल्याचे दिसत आहे. ही घटना चेंबूर परिसरातील मतदान केंद्रावर घडली आहे. नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया…
घटना कशी घडली?
Municipal Election 2026
Nagarsevak Election 2026 : पालकमंत्री जयकुमार गोरे यांची उद्धव ठाकरेंसह काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंवर टीका
Maharashtra Mahapalika Election : कल्याण पूर्व प्रभाग 18 मध्ये मतदानावेळी ईव्हीएम बंद
BMC Election 2026 Voting : मुंबईत 11.30 वाजेपर्यंत किती टक्के मतदान?
BMC Election 2026 Voting : मतदानाच्या दिवशी परिस्थिती पाहून उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय
Nagpur Poll Percentage : किती टक्के नागपूरवासियांनी बजावला मतदानाचा अधिकार ?
Maharashtra Election Poll Percentage : ठाणे महानगरपालिका निवडणुकीची टक्केवारी किती ?
१४ जानेवारी २०२६ रोजी उशिरा रात्री चेंबूरमधील आरसीएफ कॉलनीतील लोरेटो कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मतदान केंद्र सज्ज करण्याचे काम सुरू होते. पहाटे किंवा रात्रीच्या सुमारास कर्मचारी साहित्य लावत असताना शाळेच्या एका कोपऱ्यात चार फूट लांबीचा घोणस (Russell’s Viper) जातीचा अत्यंत विषारी साप बसलेला आढळला. हा साप चपळ आणि धोकादायक असल्याने कर्मचाऱ्यांनी तात्काळ सुरक्षित अंतर राखले. त्यानंतर अधिकाऱ्यांना सूचित केले.
View this post on Instagram
मतदानाची प्रक्रिया अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली असताना हा प्रकार घडल्याने स्थानिक पोलिस, अग्निशमन दल आणि सर्पमित्र यांची धावपळ उडाली. तातडीने बोलावलेल्या प्रशिक्षित सर्प बचावकर्त्याने (सर्पमित्र) मोठ्या कौशल्याने सापाला पकडले. सापाला कोणतीही इजा न करता सुरक्षित पकडून वन विभागाच्या देखरेखीखाली त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
तपासणी आणि सुटकेचा निःश्वास
साप निघाल्यानंतर संपूर्ण मतदान केंद्राची कसून तपासणी करण्यात आली. त्यानंतर कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी मोठ्या प्रमाणात सुटकेचा निःश्वास टाकला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, वेळेवर आणि जलद कारवाईमुळे कोणतीही दुर्घटना टळली आणि मतदान प्रक्रियेसाठी केंद्र पूर्णपणे सुरक्षित झाले. ही घटना मतदानाच्या दिवसापूर्वीच घडली असून, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.
राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान होत असून सकाळी 7.30 पासून मतदारांनी उत्साहाने रांगा लावत मतदानाचा अधिकार बजावला. बीएमसीमध्ये 227 वॉर्ड आहेत, तर सर्व महानगरपालिकांमध्ये मिळून 893 वॉर्ड आहेत. यामध्ये 2,869 समावेश आहे. महापालिका निवडणुकीत 15 हजार 908 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. राज्यभरात एकूण 3 कोटी 48 लाख 79 हजार 337 मतदार मतदान करणार आहेत.