मराठी मनातला ‘तो’ विचार त्यांनी मांडला असता तर…; राज ठाकरे यांच्या सभेनंतर विरोधकांची सडकून टीका

महादेव कांबळे, Tv9 मराठी

Updated on: Nov 27, 2022 | 11:37 PM

राज ठाकरे यांनी आपल्या सभेत सुधांशू त्रिवेदी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल कोणत्याही पद्धतीने त्यांचा त्यांनी निषेध व्यक्त केला गेला नाही.

मराठी मनातला 'तो' विचार त्यांनी मांडला असता तर...; राज ठाकरे यांच्या सभेनंतर विरोधकांची सडकून टीका

मुंबईः राज ठाकरे यांनी आज केलेल्या भाषणानंतर त्यांच्या विरोधकांकडू अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्याबद्दल आणि राहुल गांधी यांच्या सावरकरांच्या वक्तव्याबद्दल बोलताना त्यांनी दोन्ही मुद्दे एकच करण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोट मिठकरी यांनी केली.

राज ठाकरे यांनी केलेल्या आजच्या भाषणाबद्दल त्यांच्या भूमिकेबद्दल अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. भोंगे आणि त्यांनी मांडलेल्या परप्रांतीयांचा विषय हा जुनाच विषय त्यांनी नव्याने सांगितल्याचे अमोट मिठकरी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांनी काय भूमिका मांडली असा सवालही त्यांनी यावेळी केला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तह आणि गनिमी काव्याबाबत त्यांनी गल्लत केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या दोन्ही गोष्टींची तुलनाही कोणी करू नये असा टोलाही त्यांना लगावण्यात आला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील चाळीस गावांवर दावा सांगितला आहे. ते तेवढ्यावरच न थांबता.

त्यांनी पंढरपूर आणि अक्कलकोटवर दावा केला आहे. तरीही या मराठी मुद्याबद्दल राज ठाकरे यांनी काहीही आपले मत व्यक्त का केले नाही.

त्यांनी याविषयावर आपले मत मांडले असते तर तो महाराष्ट्राच्या मराठी मनातील विचार त्यांनी मांडला असता पण दुर्देवाने तसे आजच्या सभेत दिसून आले नाही असा टोलाही त्यांना लगावण्यात आला.

राज ठाकरे यांनी आपल्या सभेत सुधांशू त्रिवेदी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल कोणत्याही पद्धतीने त्यांचा त्यांनी निषेध व्यक्त केला गेला नाही.

त्यामुळे राज ठाकरे यांचा मराठी माणूस आणि हिंदुत्वाचं कार्ड हे महानगरपालिका निवडणुकांपुरतचं वापरायचं आहे का असा सवालही उपस्थित केला गेला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI