AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाजपशी युती हाच पर्याय’, संभाजी ब्रिगेडच्या पुरुषोत्तम खेडेकरांची भूमिका 360 अंशात बदलली?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपविरोधी भूमिकेसाठी आग्रही असलेले मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, यांच्या लेखाने राजकीय वातावरण ढवळून निघण्याची चिन्हं आहेत. कारण आगामी निवडणुकीसाठी त्यांनी चक्क भाजपसोबत युती हाच पर्याय असल्याचं म्हटलं आहे.

'भाजपशी युती हाच पर्याय', संभाजी ब्रिगेडच्या पुरुषोत्तम खेडेकरांची भूमिका 360 अंशात बदलली?
पुरुषोत्तम खेडेकर, मराठा सेवा संघ
| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 10:31 AM
Share

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपविरोधी भूमिकेसाठी आग्रही असलेले मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, यांच्या लेखाने राजकीय वातावरण ढवळून निघण्याची चिन्हं आहेत. कारण आगामी निवडणुकीसाठी त्यांनी चक्क भाजपसोबत युती हाच पर्याय असल्याचं म्हटलं आहे. मराठा सेवा संघाच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त लिहिलेल्या लेखात पुरुषोत्तम खेडेकर यांनी ही भूमिका मांडली. त्यामुळे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड हे आता भाजपसोबत युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचं दिसून येतंय.

भाजपसोबत युती हाच पर्याय

पुरुषोत्तम खेडेकर यांनी आगामी काळात राजकीय वाटचाल करताना भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याची भूमिका मांडली. मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘मराठा मार्ग’ या मासिकामध्ये संपादकीय लेख लिहिला आहे. या लेखामध्ये भाजपसोबतच्या युतीची भूमिका मांडली.

मराठा सेवा संघाची स्थापना 1 सप्टेंबर 1993 रोजी अकोला या ठिकाणी करण्यात आली. मराठा समाजातील अधिकाऱ्यांची एक संघटना म्हणून या संघटनेकडे सुरुवातीला बघितलं जात होतं.

भारतीय जनता पक्ष हा अर्थातच आरएसएसच्या नेतृत्त्वातील पक्ष आहे. विशेष म्हणजे मराठा सेवा संघाची संपूर्ण मांडणी ही आरएसएस विचारधारेच्या पूर्णपणे विरोधात आहे. मात्र तरीही पुरुषोत्तम खेडेकर यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा विचार मांडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

खेडेकरांच्या पत्नी माजी भाजप आमदार

संभाजी ब्रिगेड किंवा मराठा सेवा संघ नेहमी RSS-भाजपविरोधी भूमिका घेऊन मैदानात उतरल्याचं सर्वांना माहिती आहे. मात्र पुरुषोत्तम खेडेकर यांची पत्नी रेखाताई खेडेकर या भाजपच्या आमदार होत्या. मात्र तरीही पुरुषोत्तम खेडेकर यांनी संघ-भाजपवर टीका केली होती. इतकंच नाही तर तत्कालिन सरसंघचालक के. सुदर्शन यांच्यावर चप्पल भिरकावणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याचा सत्कार खेडेकर यांनी केला होता.

(An alliance with BJP is the only option maratha seva Sanagh Purushottam Khedekar changed the role in 360 degrees)

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.