दिवाळीपूर्वीच अनिल देशमुख तुरुंगात जाणार, त्यानंतर कुणा कुणाचा नंबर?; किरीट सोमय्यांनी केला मोठा दावा

दिवाळीपर्यंत जनतेला वाट पाहावी लागणार नाही. दिवाळीपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागेल. त्यानंतर अनिल परब यांचा नंबर लागेल. (anil deshmukh will be in jail before diwali, kirit somaiya)

दिवाळीपूर्वीच अनिल देशमुख तुरुंगात जाणार, त्यानंतर कुणा कुणाचा नंबर?; किरीट सोमय्यांनी केला मोठा दावा
KIRIT SOMAIYA

मुंबई: दिवाळीपर्यंत जनतेला वाट पाहावी लागणार नाही. दिवाळीपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागेल. त्यानंतर अनिल परब यांचा नंबर लागेल. नंतर हसन मुश्रीफ यांच्यावरही कारवाई होणार आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. (anil deshmukh will be in jail before diwali, kirit somaiya)

किरीट सोमय्या यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना हा दावा केला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमय्यांना नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितलं होतं. त्यावरही सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल परब यांची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. उलट परब यांनीच राज्यातील साडेबारा कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे. राज्यात लॉकडाऊन असताना परब यांनी स्वत:चं रिसॉर्ट बांधण्यासाठी थ्री फेसच्या एमएसईबीचं कनेक्शन घेतलं. लॉकडाऊन असताना परब बेकायदेशीरपणे रिसॉर्ट बांधत होते. याची त्यांना लाज वाटली पाहिजे, असं सोमय्या म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेची माफी मागितली पाहिजे. त्यांनीही त्यांच्या पत्नीच्या नावे 19 बेनामी बंगले बांधले आहेत. त्यामुळे त्यांनी माफी मागायला हवी, असं सांगतानाच तुमच्या काय मी उद्धव ठाकरेंच्या धमक्यांनाही घाबरत नाही. परब यांना आज ना उद्या कोर्टात जावंच लागमार आहे. परब हे जेलमधूनच कोर्टात जाऊ शकतात. सर्वांना कायदा समान आहे, असं ते म्हणाले.

घोटाळेबाजांचं नेतृत्व

मला आणि माझ्या मुलालाही धमक्या मिळत आहेत. पण आम्ही या धमक्यांना घाबरत नाही. अलिबाबा आणि त्यांच्या चाळीस चोरांचा घोटाळा बाहेर काढणारच. आम्ही थांबणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. तसेच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे स्टंटबाज आहेत. ते लक्ष डायव्हर्ट करण्याचं काम करत आहेत. उद्धव ठाकरेंनी नेमलेले मंत्री, पोलीस आयुक्त फरार झाले आहेत. हे सरकार सामान्य जनतेचं नव्हे तर घोटाळेबाजांचं नेतृत्व करत आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

सोमवारी कोल्हापूरला जाणार

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रकृती लवकर बरी व्हावी. सोमवारी मी कोल्हापूरला जाणार आहे. मुश्रीफ यांनी बेनामी साखर कारखाना उभारला हे मी कोल्हापूरकरांसमोर मांडणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

सोमय्यांचे नेमके आरोप काय?

दरम्यान सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर सोमय्यांनी 2700 पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत. मुश्रीफ कुटुंबाने 127 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. तर, मुश्रीफ यांनी सोमय्या यांच्याविरुद्ध 100 कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता. किरीट सोमय्यांनी माझ्या पक्षाविरुद्ध, पवारसाहेबांविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले आहेत. सोमय्यांनी माझ्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. किरीट सोमय्यांच्या CA पदवीबद्दलच शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती IOC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर ती खोटी असती तर त्याचवेळी समोर आलं असतं, असं मुश्रीफ म्हणाले होते. (anil deshmukh will be in jail before diwali, kirit somaiya)

 

संबंधित बातम्या:

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये तीन दिवसांपासून उपचार

किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसानीची दावा ठोकणार : हसन मुश्रीफ

हसन मुश्रीफ कुटुंबांकडून 127 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांकडून कथित ‘डर्टी 11’मध्ये राखीव खेळाडूचं नाव!

(anil deshmukh will be in jail before diwali, kirit somaiya)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI