मुंबईवर पाणी संकट, आठवडाभर मोठी पाणीकपात, पालिकेच्या पाणी साठ्याच्या सुचना

मुंबईला पाणी संकटाला तोंड द्यावं लागणार नाही (Water shortage in Mumbai). संपूर्ण मुंबईत 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे.

मुंबईवर पाणी संकट, आठवडाभर मोठी पाणीकपात, पालिकेच्या पाणी साठ्याच्या सुचना

मुंबई : कधीही न थांबणारं शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबईत कोट्यावधी लोक राहतात. या सर्वांच्याच काही मुलभूत गरजाही असतात. पाणी ही त्यातीलच एक मुलभूत गरज. मात्र, 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान मुंबईला पाणी संकटाला तोंड द्यावं लागणार नाही (Water shortage in Mumbai). या आठवड्यात संपूर्ण मुंबईत 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशनमध्ये दुरुस्तीचं काम करण्याचा निर्णय घेण्यात आला (Water shortage in Mumbai). त्यामुळे ही पाणी कपात होणार आहे.

मुंबई महापालिकेने पाणी कपातीचा अंदाज घेऊन मुंबईकरांना आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावे असे आवाहन केले आहे. मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा अशा 7 धरणांमधून दररोज 3958 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र यातील तब्बल 27 टक्के पाणी गळती आणि चोरीमुळे वाया जाते. त्यामुळे पालिकेने पाण्याची गळती रोखणे, जलवाहिन्यांची दुरुस्ती आणि यंत्रणेमध्ये सुधारणा करण्याचे धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे.

नव्या धोरणानुसार पालिकेच्या माध्यमातून पिसे उदंचन केंद्रामधील न्युमॅटिक गेट सिस्टीमची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे. 3 ते 9 डिसेंबर या कालावधीत मुंबईत 10 टक्के पाणीकपात केली जाईल. महापालिका प्रशासनाने याबाबत स्पष्ट सुचना दिल्या आहेत.

Published On - 11:08 pm, Sat, 30 November 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI