Bird Flu | संकट वाढले! राज्यातील पाच जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू; प्रशासन अ‍ॅलर्ट

परभणीपर्यंत मर्यादित असलेलं बर्ड फ्ल्यूचं संकट आता राज्यभर पसरलं आहे. (bird flu confirmed in maharashtra's five districts)

Bird Flu | संकट वाढले! राज्यातील पाच जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू; प्रशासन अ‍ॅलर्ट
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 1:00 PM

मुंबई: परभणीपर्यंत मर्यादित असलेलं बर्ड फ्ल्यूचं संकट आता राज्यभर पसरलं आहे. राज्यातील परभणीसह मुंबई, ठाणे, रत्नागिरीतील दापोली आणि बीडमध्ये बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या पाचही जिल्ह्यातील प्रशासन अ‍ॅलर्ट झालं आहे. (bird flu confirmed in maharashtra’s five districts)

बीड आणि परभणीतील मुरुंबा गावात कोंबड्याचा मृत्यू झाला होता. भोपाळच्या प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचं स्पष्ट झालं आहे. रत्नागिरीतील दापोली आणि मुंबईतील चेंबूरमधील कावळ्यांचा आणि ठाण्यातील पोपटांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूनेच झाल्याचंही प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालात नमूद केलं आहे. त्यामुळे प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले असून राज्य शासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

परभणीत कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूनेच झाल्याचं निदान झाल्यानंतर परभणीतील 80 हजार कोंबड्या मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर आता बीडमध्येही ज्या परिसरात बर्ड फ्ल्यूने कोंबड्या दगावल्या आहेत, त्या परिसरातील कोंबड्या मारण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं.

पोपट आणि कावळ्यांचं करायचं काय?

परभणीत 800 कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्यानंतर येथील 80 हजार कोंबड्या मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज संध्याकाळपर्यंत या कोंबड्यांना मारण्यात येणार आहे. मात्र, ठाण्यात पोपट आणि मुंबईत कावळ्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे पोपट आणि कावळ्यांचा संचार कसा रोखणार? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. (bird flu confirmed in maharashtra’s five districts)

संबंधित बातम्या:

Bird Flu | परभणीत बर्ड फ्ल्यूचा धसका; संध्याकाळपर्यंत 10 हजार कोंबड्या नष्ट करणार

परभणीतल्या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती, महाराष्ट्र अलर्टवर

Bird Flu | बर्ड फ्लू नेमका काय?, लक्षणे कोणती?, औषध काय?, सर्व प्रश्नांची उत्तरं!

Bird Flu | कोंबडीचे मांस आणि अंडी खाल्ल्याने ‘बर्ड फ्लू’चा धोका? वाचा संशोधन काय म्हणतेय…

(bird flu confirmed in maharashtra’s five districts)

Non Stop LIVE Update
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?.
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका.
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका.
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.