AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक लाख घरं आणि बरंच काही… मुंबईकरांवर ठाकरे बंधूंचं जाळं; काय काय केल्या घोषणा?

BMC Election : आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांना आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दोघांनी काय म्हटले ते जाणून घेऊयात.

एक लाख घरं आणि बरंच काही... मुंबईकरांवर ठाकरे बंधूंचं जाळं; काय काय केल्या घोषणा?
Aaditya Thackeray and amit thackerayImage Credit source: X
| Updated on: Jan 02, 2026 | 4:02 PM
Share

राज्यात सध्या 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे बहुतांशी ठिकाणचे चित्र स्पष्ट झाले आहे. अशातच आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांना आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आदित्य ठाकरेंनी आपल्या अनेक उमेदवारांनी फोन आणि धमक्या आल्याची माहिती दिली आहे. मुंबई मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे यासाठी आपण लढत आहोत असंही ते म्हणाले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुंबईकरांना घरे देणार

आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी उमेदवारांना या निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे काय आहेत याची माहिती दिली. आदित्य ठाकरे म्हणाले की मुंबईतील जमीन ही मुंबईकरांच्या घरांसाठीच देण्यावर आपला भर असणार आहे.  ही जमीन विकासकांमांसाठी दिली जाणार नाही. या जमीनीवर गिरणी कामगारांसाठी, बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी, पोलिस कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधण्याची आपली योजना आहे. यासाठी मुंबई महापालिका स्वत:च गृहनिर्माण धोरण तयार करेल. एक लाख घरे निर्माण करण्याची योजना आहे.

बेस्ट प्रवास स्वस्त करणार

पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी, मुंबईकरांच्या खिशाला परवडेल असा बेस्ट प्रवास देण्यावर आमचा भर असणार आहे. तिकीट दरवाढ कमी करून ती 5, 10,15,20 रुपये करणार आहोत. आगामी काळात बेस्टच्या ताफ्यात 10 हजार इलेक्ट्रिक बस सामील करणार आहोत. तसेच 900 डबल डेकर बस खरेदी करणार आहोत. बंद झालेले जुने मार्ग पुन्हा सुरू करण्यावर आपला भर असेल.

आरोग्य आणि शिक्षणावर भर

मुंबई महापालिकेतील उमेदवारांना मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे यांनी आपण शहरातील सार्वजनिक आरोग्यावर भर देणार असल्याची माहिती दिली. पालिका रुग्णालयांमध्ये जेनरिक ओषधे मोफत देण्याची आपली योजना आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी 24 तास हेल्थ केअर कंट्रोल रूम आणि हेल्थ टू होम सेवा सुरू करणार आहोत. तसेच पालिकेचे स्व:ताचे कॅन्सर रुग्णालय असेल असंही यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच पालिकांच्या शाळांमध्ये 12 वी पर्यंत ज्युनियर कॉलेज सुरू करण्यात येईल, तसेच सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये बोलतो मराठी हा उपक्रम सुरू करणार असल्याची माहितीही यावेळी आदित्य ठाकरे यांनी उमेदवारांना दिली आहे.

तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ
तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ.
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल.
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?.
BMC निवडणुकीसाठी शिंदे सेनेची अधिकृत उमेदवार यादी जाहीर, कोणाला संधी?
BMC निवडणुकीसाठी शिंदे सेनेची अधिकृत उमेदवार यादी जाहीर, कोणाला संधी?.
फक्त 2 ओळी अन् मनसेचा राजीनामा..11 पदाधिकाऱ्यांनी राज यांची सोडली साथ
फक्त 2 ओळी अन् मनसेचा राजीनामा..11 पदाधिकाऱ्यांनी राज यांची सोडली साथ.
मयत झालेल्यांवर निवडणुकीची जबाबदारी...संभाजीनगर प्रशासनाचा कारभार उघड
मयत झालेल्यांवर निवडणुकीची जबाबदारी...संभाजीनगर प्रशासनाचा कारभार उघड.
भाजपच्या पूजा मोरेंची उमेदवारी, जुन्या व्हिडीओवरून जरांगेंचा थेट इशारा
भाजपच्या पूजा मोरेंची उमेदवारी, जुन्या व्हिडीओवरून जरांगेंचा थेट इशारा.
पुण्यात सत्तेचा सारीपाट, कोण मारणार बाजी? नागरिकांच्या भावना काय ?
पुण्यात सत्तेचा सारीपाट, कोण मारणार बाजी? नागरिकांच्या भावना काय ?.
अपक्ष उमेदवारालाच लोकांनी घरातच कोंडलं, BJP नं दिलेला AB फॉर्म रद्द अन
अपक्ष उमेदवारालाच लोकांनी घरातच कोंडलं, BJP नं दिलेला AB फॉर्म रद्द अन.
UTS ॲप बंद! लोकल तिकीट अन पासची सुविधा कायमस्वरूपी बंद, पर्याय काय?
UTS ॲप बंद! लोकल तिकीट अन पासची सुविधा कायमस्वरूपी बंद, पर्याय काय?.