AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालन्यातील लाठीचार्ज, मनोज जरांगेंशी चर्चेची तयारी ते आरक्षण कसं मिळणार?; देवेंद्र फडणवीसांची महास्फोटक मुलाखत

Devendra Fadnavis TV9 Marathi Interview : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. अशात सरकार यावर तोडगा कसा काढणार आहे? मनोज जरांगे यांच्याशी चर्चेसाठी सरकार तयार आहे का? राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्सक्ल्युझिव्ह मुलाखत, टीव्ही 9 मराठीवर... पाहा...

जालन्यातील लाठीचार्ज, मनोज जरांगेंशी चर्चेची तयारी ते आरक्षण कसं मिळणार?; देवेंद्र फडणवीसांची महास्फोटक मुलाखत
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 29, 2023 | 10:32 AM
Share

मुंबई | 29 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षण हा सध्या राज्यातील हॉट टॉपिक आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणारच नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. मनोज जरांगे पाटील सध्या उपोषण करत आहेत. त्यामुळे आरक्षण प्रश्नी राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या सगळ्या प्रश्नांवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत सविस्तर उत्तरं दिली. मराठा आरक्षण प्रश्नी चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे यांना त्यांनी साद घातली. तसंच हा प्रश्न कसा सोडवणार यावरही भाष्य केलं.

मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीतार्ज झाला. या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले. या लाठीचार्जबद्दल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका झाली. मात्र हा लाठीचार्ज झाला कसा? यावर देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केलं. मला जालन्यातील लाठीमारची माहिती नव्हती. मी एका कार्यक्रमात होतो. माझा संबंध नसताना मी माफी मागितली होती. पण आता जे काही सुरू आहे. त्यावरून मुख्यमंत्री काम करत आहे. त्यांना संधी दिली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टीव्ही 9 मराठीवरील मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी सरकार जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं. सरकार जेवढ्या वेगाने सोडवणूक करता येईल तेवढा प्रयत्न करू. गिरीश महाजन यांनी त्याच दिवशी संवाद साधला. आमचा प्रयत्न सुरू आहे. मीडियाच्या माईकसमोर संवाद होऊ शकत नाही. संवाद करायचं तर दहा माणसं बसवा. शंभर माणसं बसवा. माईक समोर संवाद होत नाही. चार गोष्टी तुम्ही सांगा, आम्हीही चार गोष्टी सांगू. आमचं त्यांना चर्चेचं नेहमीच आवाहन आहे. मुख्यमंत्रीच स्वत चर्चा करत आहेत. आमचा प्रयत्न आहे आंदोलन लवकर लॉजिकल एंडला नेता यावं. प्रश्न सुटावा. कायद्याने काय प्रश्न असेल तर मार्गी लावू. शिंदे समिती काम करत आहे. वाऱ्यावर कुणालाच सोडलं नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

आंदोलकांनी हिंसा करू नये. लोकशाहीत गावबंदी करणं योग्य नाही. त्यांनी केलीय आपण प्रत्येकाला समजावू शकत नाही. आमचा प्रयत्न शांतता राहावी. हिंसा होऊ नये. प्रश्न सोडवण्याचं काम आम्हीच करत आहोत. त्यांचा प्रश्न सोडवणं हेच आमचं काम आहे. तेच आम्ही करत आहोत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Follow Us
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! भाविकाकडुन कोट्यवधींच दान
Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
Jay Pawar | अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट...
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट उत्तर
सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने....
Pankaja Munde | सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकारणात नव्या चर्चांना उधाण
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच...
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच पवार कुटुंबीयांना मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी, कोल्हापूर हादरलं, भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार थेट….

मोठी बातमी, कोल्हापूर हादरलं, भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार थेट…

छाती दाबणे, सलवार काढणे बलात्काराचा प्रयत्न नाही, पटणा कोर्टाची टिप्पणी, आता महिला आयोगाची प्रतिक्रिया आली!.

छाती दाबणे, सलवार काढणे बलात्काराचा प्रयत्न नाही, पटणा कोर्टाची टिप्पणी, आता महिला आयोगाची प्रतिक्रिया आली!

IND vs END 2nd ODI: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने, गिलच्या मनात होतं वेगळं; म्हणाला...

IND vs END 2nd ODI: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने, गिलच्या मनात होतं वेगळं; म्हणाला..

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत हा दिग्गज खेळाडू खेळणार नाही! कोण घेणार जागा?.

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत हा दिग्गज खेळाडू खेळणार नाही! कोण घेणार जागा?

उंच उंच हवेल्या, मोठे दरवाजे, इमारतीखालून जाणारे रस्ते, भारतातील असं एक गावं जिथे 60 दिवसांमध्ये जमा झाले 1200 कोटी रुपये.

उंच उंच हवेल्या, मोठे दरवाजे, इमारतीखालून जाणारे रस्ते, भारतातील असं एक गावं जिथे 60 दिवसांमध्ये जमा झाले 1200 कोटी रुपये

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?.

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?