AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाकरमानी, छे, आता कोकणवासीय! अजितदादांनी गणेशोत्सवात मनं जिंकली रे

Chakarmani instead use Kokanvasi : चाकरमानी या शब्दाऐवजी कोकणवासीय असा शब्द प्रयोग होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेशोत्सवात कोकणी माणसांची मनं जिंकली आहे. काय होता हा वाद, काय होती ही मागणी?

चाकरमानी, छे, आता कोकणवासीय! अजितदादांनी गणेशोत्सवात मनं जिंकली रे
चाकरमानी, कोकणवासीय
| Updated on: Aug 23, 2025 | 10:10 AM
Share

Ajit Pawar decision : कोकणवासीयांसाठी एक महत्त्वाचा निर्णय शासन दरबारी घेण्यात आला आहे. मुंबईत अनेक कोकणी माणसं राहतात. ते गणेशोत्सवाच्या काळात गावी जातात. त्यांना शासन दरबारी अनेक वर्षांपासून चाकरमानी असा शब्द प्रयोग करण्यात येतो. या नागरिकांसाठी चाकरमानी हा शब्द गेल्या कित्येक वर्षांपासून प्रचलित झाला आहे. पण हा शब्द अवमानकारक असल्याने तो हटवण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती. या शब्दाऐवजी कोकणवासीय असा शब्द वापरण्याची मागणी करण्यात येत होती. त्याची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. त्यांनी ऐन गणेशोत्सवात चाकरमान या शब्दाऐवजी कोकणवासीय असा शब्द वापरण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. लवकरच याविषयीचे परिपत्रकही काढण्यात येणार आहे.

अनेक संघटनांचा चाकरमानी शब्दाला आक्षेप

चाकरमानी या शब्दातच गुलामी ध्वनीत होते. चाकर म्हणजे सेवक, नोकर तर मानी म्हणजे मानणारा. या शब्दावरुन खल सुरू होता. हा शब्द तसा सर्रास वापरण्यात येत होता. अनेकांच्या तो अंगवळणी पडला होता. चाकरमानी या शब्दाला अनेक संघटनांचा विरोध होता. कोकणातील अनेक संघटनांनी हा शब्द गुलामीचे प्रतिक वाटत असल्याचे म्हटले होते. त्यांनी हा शब्द शासन दरबारी वापरण्यावर आक्षेप नोंदवला होता. अजितदादांनी कोकणातील नागरिकांच्या भावना लक्षात घेत हा शब्द, शासकीय वापरातून वगळण्याचा श्रीगणेशा केला. त्यांनी चाकरमानी या शब्दाऐवजी कोकणवासीय असा शब्द प्रयोग करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. याविषयीचे परिपत्रकही सरकार लवकरच काढणार आहे.

फडणवीस-शिंदे-पवारांमध्ये बैठक

दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच महायुतीमधील तीनही प्रमुख नेत्यांमध्ये बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांमध्ये एक तासांहून अधिक काळ बैठक चालली. महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला एकत्र सामोरे जाणार की हे पक्ष त्या त्या ठिकाणी स्वबळाची चाचपणी करणार ही बाब समोर आलेली नाही. महाविकास आघाडीकडून ही याविषयीची कोणती घोषणा झालेली नाही. आता निवडणुका तोंडावर आलेल्या असताना चर्चा आणि बैठकांना वेग आल्याचे समोर येत आहे. या बैठकीत नेमकं कोणत्या विषयावर, मुद्दावर चर्चा झाली हे समोर आलेले नाही.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.