AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramdas Athawale : रामदास आठवलेंची नवीन कविता वाचली का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना असा काढला चिमटा

Ramdas Athawale on Raj-Uddhav : रामदास आठवले हे शीघ्रकवी म्हणून सुद्धा ओळखले जातात. त्यांच्या कविता हा जनसामान्यांचाच नाही तर राजकारण्यांना ही आवडतात. संसदेत ही त्यांच्या कवितांना चांगली दाद मिळाल्याचे आपण पाहिले आहे. आता त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांना असा चिमटा काढला आहे...

Ramdas Athawale : रामदास आठवलेंची नवीन कविता वाचली का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना असा काढला चिमटा
रामदास आठवले, राज ठाकरे, उद्धव ठाकरे
| Updated on: Aug 22, 2025 | 12:53 PM
Share

रिपाई नेते रामदास आठवले हे त्यांच्या कवितांसाठी ओळखले जातात. शीघ्र कविता हे त्यांचे वैशिष्ट्ये आहे. यमक जुळवत कवितेतून चिमटे काढणे हा त्यांचा छंद आहे. त्यांच्या कविता हा जनसामान्यांचाच नाही तर राजकारण्यांना ही आवडतात. संसदेत ही त्यांच्या कवितांना चांगली दाद मिळाल्याचे आपण पाहिले आहे. त्यांच्या कवितांवर टीका होत असली तरी त्यांची कविता ऐकून त्याला मनमुराद दाद देणाऱ्यांची संख्या कमी नाही. आता त्यांनी धाराशिवच्या दौऱ्यावर असताना राज आणि उद्धव ठाकरे यांना असा चिमटा काढला आहे.

असा काढला चिमटा

“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची झाली युती, मात्र बेस्टच्या निवडणुकीत झाली त्यांची माती” अशी कविता त्यांनी केली. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर रामदास आठवले यांची त्यांच्या शैलीत टीका केली.राज ठाकरे यांची फक्त सभा घेण्यापूर्वी ताकद, त्यांना मत पडत नाहीत, त्यांना इव्हेंट मॅनेजमेंट फक्त जमतं. राज ठाकरेंना मत पडणार नाहीत ही कळ्या दगडावरील रेघ असल्याचा चिमटा ही आठवले यांनी काढला.

आरपीआयचा स्वबळाचा नारा

महायुती म्हणून आगामी निवडणुका लढाव्या आणि आरपीआयलाही सन्मान योजना जागा मिळाव्यात अशी मागणी त्यांनी केली. मुंबई महानगरपालिकेत आरपीआयला 15 जागांची रामदास आठवले यांच्याकडून मागणी, योग्य वाटा मिळाला नाही तर आरपीआय स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. राज्यभरात आरपीआयची ताकद आहे. त्या ठिकाणी सन्मान जनक वाटा मिळावा अशी मागणी त्यांनी केली. धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असलेल्या रामदास आठवले यांनी एकला चलो रे ची भूमिका जाहीर केली आहे.

मराठा आंदोलक सुद्धा भेटीला

दरम्यान मराठा आंदोलकांनी रामदास आठवले यांची भेट घेतली. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी आठवले यांनी भूमिका मांडावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली. तर मुंबई मोर्चापूर्वी मराठा आरक्षणाविषयीचा तोडगा काढावा यासाठी आठवलेंनी भूमिका जाहीर करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यावर याप्रकरणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ आणि त्यांना मराठा समाजाच्या मागण्यांविषयी अवगत करू असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.