26/11 च्या हल्ल्यात शस्त्रांचं घबाड शोधून देणारा तारा निखळला, कॅनिंग सैनिक ‘नॉटी श्वाना’चा मृत्यू

26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शस्त्र आणि दारूगोळा शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या निवृत्त कॅनिंग सैनिकाचं निधन झालं आहे (26/11 Hero dog Nauty who play important role dies in Palghar)

26/11 च्या हल्ल्यात शस्त्रांचं घबाड शोधून देणारा तारा निखळला, कॅनिंग सैनिक 'नॉटी श्वाना'चा मृत्यू
कसाबने लपवलेला शस्त्रसाठा शोधून काढणारा कॅनिंग सैनिक कालवश, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात मौल्यवान कामगिरी करणारा तारा निखळला
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 6:04 PM

पालघर : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 च्या रात्रीचा दहशतवादी हल्ला (26/11 Mumbai Attack) मुंबईकर कधीही विसरु शकत नाहीत. या हल्ल्यावेळी पोलिसांनी जीवाची बाजी मारली. अनेक पोलीस कर्मचारी शहीद झाले. या हल्ल्यावेळी शस्त्र आणि दारूगोळा शोधण्यात कॅनिंग सैनिक असलेल्या श्वानांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या हल्ल्यावेळी अशीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या निवृत्त कॅनिंग सैनिक असलेल्या एका श्वानाचं निधन झालं आहे. या श्वानाचं नाव नॉटी असं आहे. त्याने सोमवारी (10 मे) अखेरचा श्वास घेतला. तो 14 वर्षांचा होता (26/11 Hero dog Nauty who play important role dies in Palghar).

2014 मध्ये सेवा निवृत्त

पालघरमधील सफाळे येथील माजी रणजीपटू राजेश सुतार यांनी त्याला दत्तक घेतलं होतं. ब्लॅक लॅबरेडॉर जातीचा असलेला नॉटी हा 2014 मध्ये सेवा निवृत्त झाला होता. लष्कर ए तोयबाचा दहशदवादी अजमल कसाब याने लपवलेला शस्त्रसाठा आणि दारुगोळा याच श्वानाने शोधून काढला होता. नॉटी अचानक आजारी पडला. त्याचं वय 14 वर्ष इतकं पूर्ण झालं होतं. बॉम्बे वेटरनरी कॉलेज, लोअर परेल स्पंदन या स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नॉटीने शौर्य पुरस्कारावर आपलं नाव कोरलं होत (26/11 Hero dog Nauty who play important role dies in Palghar).

मुंबईत दहा ठिकाणी दहशतवादी हल्ले

26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री दहशतवाद्यांनी मुंबईत एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या परिसरात हल्ले झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये स्फोट घडवून आणला होता.

भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर दहशतवादी हल्ल्यासाठी अतिरेक्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. दहशतवाद्यांनी मुबईवर हल्ला करण्यासाठी आधुनिक शस्त्रांचा वापर केला होता. मुंबई पोलीस आणि भारतीय सैन्यदलाला तीन दिवसानंतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले होते.

हल्ले करणाऱ्या 10 पैकी 9 दहशतवाद्यांना मुंबई पोलीस आणि एनएसजीच्या कमांडोंनी कंठस्नान घातले तर अजमल आमीर कसाब हा दहशतवादी पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते आणि या हल्ल्यांमागे लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता.

हेही वाचा : कोरोनाच्या लस कधी मिळणार? किती मिळणार?; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी अखेर मौन सोडलं

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.