AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर लोटांगण घातले? कोणी केला आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

तपास यंत्रणांच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर लोटांगण घातले, असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केला.

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर लोटांगण घातले? कोणी केला आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
उद्धव ठाकरे-नरेंद्र मोदी (फाईल फोटो) Image Credit source: TV 9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 19, 2025 | 11:38 AM
Share

शिवसेनेत बंडखोरीनंतर दोन्ही गटाकडून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. खरी शिवसेना कोणाची? याबाबत दोन्ही गट आपलाच दावा करत आहे. परंतु आता शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. भाजपवर नेहमी आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर लोटांगण घातले होते, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.

तपास यंत्रणांच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर लोटांगण घातले, असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केला. दिल्लीत जाऊन मला वाचवा, राज्यात युती सरकार स्थापन करु, असे सांगून आलेल्या ठाकरे यांनी राज्यात आल्यावर पलटी मारली, असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठावर केला.

संभाजी महाराजांवर बोलण्याचा अधिकार नाही…

राज्य सरकारच्या वतीने आज उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विधान परिषदेत निवेदन सादर केले. ते पुढे म्हणाले की, सत्तेसाठी उबाठा शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सोडले आणि औरंगजेबी विचार स्वीकारले आणि काँग्रेससोबत गेले. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवले त्यांच्याबरोबर तुम्ही सत्तेसाठी गेलात, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. काँग्रेसकडे गहाण टाकलेला धनुष्यबाण आणि शिवसेनेला आम्ही अडीच वर्षांपूर्वी धाडस करुन सोडवले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. औरंगजेबाचे विचार स्वीकारल्याने तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांवर बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना उबाठा गटाला यावेळी सुनावले.

महाविकास आघाडीकडून षडयंत्र

आपण कधी सत्तेचा आणि खुर्चीचा कधीच मोह केला नाही. खुर्चीपाठी बसलेल्या माणसांच्या अडचणी सोडवण्याला कायम प्राधान्य दिले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महाविकास आघाडी सरकार असताना देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांना जेलमध्ये टाकण्याचे षडयंत्र केले होते. मात्र आम्ही मंत्रीपदावर लाथ मारली, उठाव करुन महाविकास आघाडी सरकारचा टांगा पलटी केला आणि महायुतीचे सरकार आणले, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात सांगितले.

आता महाराष्ट्रात फिरु लागले

उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन केले पाहिजे. पूर्वी आमदारांना मंत्र्यांना ते भेटत नव्हते. आता गटप्रमुखांना ते भेटतात. आता ही सुधारणा झाली आहे. मी डॉक्टर नसलो तरी हा उपचार केला आहे. ऑपरेशन केले आहे. आता लोक तरातरा फिरू लागले आहे. महाराष्ट्रात दिसू लागले आहे. त्याचे क्रेडिट आता मला दिले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता शिंदे म्हणाले.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी