AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Tourist Places : नाशिकमधील अनेक पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी, कोणती पर्यटनस्थळं बंद, कोणती सुरू? वाचा

गडांवर किंवा पर्यटन स्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न नागरीकांनी करु नये, अन्यथा संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा नाशिक पश्चिम भाग उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

Nashik Tourist Places : नाशिकमधील अनेक पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी, कोणती पर्यटनस्थळं बंद, कोणती सुरू? वाचा
नाशिकमधील अनेक पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी, कोणती पर्यटनस्थळं बंद, कोणती सुरू? वाचाImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 16, 2022 | 5:40 PM
Share

नाशिक : सगळीकडे सध्या अतिवृष्टी सुरु (Heavy Rain) आहे. त्यामुळे पर्यटन स्थळी (Tourist Place) जास्त प्रमाणात लोकांची गर्दी होत असल्याने अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नाशिक पश्चिम विभागाच्या अधिनस्त त्र्यंबकेश्वर (Trimkeshwar) तालुक्यातील पहिने, दुगारवाडी, हरीहर, भास्करगड, अंजनेरी, वाघेरा, इगतपुरी तालुक्यातील भावली, त्रिंगलवाडी, कुरुंगवाडी आदी सर्व गडांवर आणि सर्व पर्यटन स्थळी आजपासून पुढील आदेश मिळेपर्यंत प्रवेश बंद करण्यात आले आहेत. ह्या गडांवर किंवा पर्यटन स्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न नागरीकांनी करु नये, अन्यथा संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा नाशिक पश्चिम भाग उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. याबाबत नागरीकांनी नोंद घ्यावी. आणि आदेशाचे काटेकोरपणे पालन करुन नागरीकांनी वन विभागास सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी निर्णय

इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत तंतोतंत पालन करण्यात येणार आहे. नाशिक शहर व सभोवतालच्या परिसरात काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून, नागरीकांना व पर्यटन प्रेमी यांना पर्यटन क्षेत्रास भेट देण्याचा मोह अनावर होणे साहजिकच आहे. परंतु नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे. या दिवसात अनेक जण गड किल्ले सर करायला जातात. अनेक जण ट्रेकिंगला जातात. अनेकजण धबधब्यात भिजायला जातात पावसाळा म्हणजे जणू पिकनिक जाम मौसमच असतो. त्यामुळे या दिवसातच मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत अनेक फिरायेच प्लॅन बनतात. मात्र होणारे अपघात या आनंदात विर्जन टाकण्याचे काम करतात, तेच टाळण्याचा प्रयत्न पर्यटन विभागाडून करण्यात येत आहे.

खबरदारी म्हणून मोठा निर्णय

पावसाळा म्हटलं की हिरवेगार डोंगर, गडकिल्ले, धबधबे अशी ठिकाण अतिशय सुंदर बनलेले असतात. सहाजिकच या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक पावसाळ्यात दाखल होतात. आपल्या महाराष्ट्रात ही अशी अनेक पर्यटन स्थळ आहेत. ज्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात नाशिक जिल्ह्यातील पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात असतो. मात्र याच पावसाळ्यात पाऊस, चिखल यामुळे अपघातांचा धोका जास्त असतो. तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळण्यासारख्या घटनाही घडत असतात. त्यामुळे आता पर्यटन विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे आदेश काढण्यात आलेले आहे. त्यामुळे धोका टाळण्यासाठी या आदेशाची पालन करणे आवश्यक आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.