Mumbai Building Collapsed Video : बोरिवलीत चार मजली इमारत कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही, आधीच केली होती इमारत रिकामी

बोरिवली पश्चिमेकडील साईबाबा नगरमधील गितांजली ही इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. ही इमारत खूप जुनी आहे. या इमारतीत काही कुटुंब वास्तव्याला होते.

Mumbai Building Collapsed Video : बोरिवलीत चार मजली इमारत कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही, आधीच केली होती इमारत रिकामी
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 2:39 PM

मुंबई : राज्यभरात सध्या दहीहंडीचा उत्साह सुरू आहे. मात्र दुसरीकडे बोरिवलीमधून (Borivali) एक दुर्घटना समोर येत आहे. बोरिवली पश्चिममध्ये असलेल्या  साईनगर येथील एक चार मजली इमारत कोसळल्याची (Building Collapsed) दुर्घटना घडली आहे. गीतांजली असे या इमारतीचे नाव आहे. या इमारतीत काही जण अडकल्याची शक्यता सुरुवातीला व्यक्त करण्यात येत होती. मात्र या इमारतीमध्ये कोणीही अडकले नसल्याची माहिती आता समोर येत आहे. आज सकाळीच या इमारतीमधील रहिवाशांना नोटीस देऊन बाहेर काढण्यात आले होते. व त्यानंतर काही वेळातच ही इमारत कोसळली. वेळीच इमारतीमधून बाहेर पडल्याने सर्व रहिवासी सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.  मात्र तरी देखील या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का? याचा शोध अग्निशमन दालाच्या (fire brigade) पथकाकडून सुरू आहे. मात्र या दुर्घटनेमध्ये शेजारच्या फुटपाथावर राहणारे काही व्यक्ती  जखमी झाल्याची माहिती स्थानिकांकडून प्राप्त होत आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बोरिवली पश्चिममध्ये असलेल्या साईनगरमध्ये ही गितांजली नावाची चार मजली इमारत होती. ग्राऊंड फ्लोअर धरून या इमरतीला एकूण चार मजले होते. ही इमारत जुनी झाली होती. आज ही इमारत अचानक कोसळली.  या इमारतीमध्ये काही कुटुंबे वास्तव्याला होती.  मात्र या इमरातीमध्ये राहाणाऱ्या कुटुंबाला नोटीस देऊन आजच बाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सर्व कुटुंबे सुरक्षीत असल्याची माहिती प्राप्त होत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल,पोलीस, बीएमसीचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या या इमारतीचा मलबा हटवण्याचे काम सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

फूटपाथावरील नागरिक जखमी

दरम्यान स्थानिकांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार या इमरातीच्य शेजारी एक फूटपाथ देखील आहे. या फूटपाथावर बसलेले काही लोक या घटनेत जखमी झाले आहेत. सध्या या इमारतीचा मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. येथील नागरिकांना वेळीच बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. सर्व नागरिक सुरक्षित आहेत, मात्र तरी देखील कोणी आत अडकले आहे का याचा शोध सुरू असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?.
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?.
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?.
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका.