Corona : गुढीपाडव्याच्या शोभा यात्रांना कोरोनाचा फटका, गिरगावातील शोभा यात्रा रद्द

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षानिमित्ताने आयोजित केलेल्या सर्व स्वागत यात्राही रद्द करण्यात आल्या (Corona Virus Girgaon Shobhayatra cancelled) आहेत. 

Corona : गुढीपाडव्याच्या शोभा यात्रांना कोरोनाचा फटका, गिरगावातील शोभा यात्रा रद्द

मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवेस वाढ होत (Corona Virus Girgaon Shobhayatra cancelled) आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सर्व शाळा, कॉलेज, मॉल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्य सरकारकडून गर्दी टाळण्याचं आवाहन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षानिमित्ताने आयोजित केलेल्या सर्व स्वागत यात्राही रद्द करण्यात आल्या आहेत.

“राज्यात आणि मुंबई शहरात कोरोना सारखा संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी (Corona Virus Girgaon Shobhayatra cancelled) विभागातील आणि गिरगावकरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून यंदाच्या वर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्ष सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य मिरवणूक सोहळा रद्द करण्यात येत आहे. पुढील वर्षी हाच सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात तमाम हिंदू बांधव तसेच गिरगावकरांच्या सहकार्याने आणि आशिर्वादाने साजरा करण्यात येईल,” असे विनम्र आवाहन दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी केले आहे.

तर दुसरीकडे ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि इतर भागांमध्ये 25 मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येतात. त्यापैकी ठाणे आणि डोंबिवली शहरात मोठ्या स्वागतयात्रा निघतात. या स्वागत यात्रेच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक संदेश देण्यात येतो.

मात्र, सध्या फोफावत असलेल्या करोना विषाणूचा शिरकाव राज्यासह ठाण्यातही झाला असून या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सर्व स्वागत यात्रा रद्द करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत यंदाच्या स्वागतयात्रा रद्द करण्याचा एकमुखी निर्णय आयोजकांनी घेतला.

पिंपरी-चिंचवड या ठिकाणी 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 15 वर पोहोचली आहे. तर राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 31 झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्यात भीतीचे वातावरण पसरलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सर्व शाळा, कॉलेज, मॉल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला (Corona Virus Girgaon Shobhayatra cancelled) आहे.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

 • पुणे – 15
 • मुंबई – 5
 • नागपूर – 4
 • यवतमाळ – 2
 • नवी मुंबई – 2
 • ठाणे – 1
 • कल्याण – 1
 • अहमदनगर – 1

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

 • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
 • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
 • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
 • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
 • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
 • नागपूर (1) – 12 मार्च
 • पुणे (1) – 12 मार्च
 • पुणे (3) – 12 मार्च
 • ठाणे (1) – 12 मार्च
 • मुंबई (1) – 12 मार्च
 • नागपूर (2) – 13 मार्च
 • पुणे (1) – 13 मार्च
 • अहमदनगर (1) – 13 मार्च
 • मुंबईत (1) – 13 मार्च
 • नागपूर (1) – 14 मार्च
 • यवतमाळ (2) – 14 मार्च
 • मुंबई (1) – 14 मार्च
 • वाशी (1) – 14 मार्च
 • पनवेल (1) – 14 मार्च
 • कल्याण (1) – 14 मार्च
 • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
 • एकूण – 31 कोरोनाबाधित रुग्ण

संबंधित बातम्या : 

Corona | मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द, निवडणुकाही पुढे ढकलण्याची मागणी

Corona virus | चीन, इराणसह 7 देशांचा प्रवास करुन आलेल्यांसाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या सूचना

महाराष्ट्रातील सर्व शाळा-कॉलेज 31 मार्चपर्यंत बंद, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

Corona | मोदी सरकारचा मोठा निर्णय, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नातेवाईकांना 4 लाखांची मदत

CORONA : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली, यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाची लागण

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI