आंबिवली – टिटवाला दरम्यान गवताला आग, मध्य रेल्वेच्या लोकल विस्कळीत
मध्य रेल्वेच्या लोकल सेवा ऐन गर्दीच्या वेळी रखडली आहे.या मार्गवरून डाऊन दिशेला जाणाऱ्या लोकलना फटका बसला आहे. आंबिवली आणि टिटवाळा दरम्यान ट्रॅक शेजारील वाळलेल्या गवताला मोठी आगल्याने या मार्गावरील लोकल सेवा काही काळ सुरक्षेसाठी थांबविण्यात आली होती.

मध्य रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा अचानक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्यावेळी सायंकाळी कामावरुन घरी परतणाऱ्या लोकांना या फटका बसला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आंबिवली – टिटवाला स्थानकादरम्यान रेल्वेच्या कडेला असलेल्या गवताला आग लागल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून लोकल काही वेळ थांबविण्यात आल्याने लोकलच्या एकामागोमाग रांगा लागण्याने कामावरुन घरी परतणाऱ्या लोकांना याचा फटका बसला आहे. लोकल ट्रेन १५ ते २० मिनिटे उशीराने धावत असल्याने लोकलमध्ये आणि रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलची सेवा शुक्रवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास ऐन पिक अवरमध्ये कामावरुन घरी जाण्यासाठी प्रचंड गर्दी असताना हा लोकलची रखडपट्टी सुरु झाल्याने लोकलमध्ये प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे. आंबिवली आणि टिटवाळा दरम्यान रेल्वेच्या कडेला असलेल्या गवाताला मोठी आग लागली. त्यामुळे सुरक्षेची बाब म्हणून लोकल ट्रेनची वाहतूक प्रवाशांना झळांचा त्रास होऊन नये म्हणून लोकलची वाहतूक काही वेळ थांबविण्यात आली.त्यामुळे लोकलच्या एकामागोमाग लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांची मोठी रखडपट्टी झाली. त्यामुळे मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर गर्दी प्रचंड वाढली आहे.
जंगली गवाताला नेहमीच आग लागण्याच्या घटना
रेल्वे रुळांच्या कडेला जंगल वाढू दिल्याने उन्हाळ्यात या गवताला आग लागल्याने सिग्नल केबल जळाल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यामुळे हे गवत वेळीत कापून टाकावे असे रेल्वेकडे वारंवार प्रवाशी संघटना मागणी करत असतात. ऐन गर्दीच्या वेळी हा अपघात घडल्याने अग्निशमन दलाच्या मदतीने या आगीवर नियंत्रण करण्याची मागली होत आहे.
