AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतल्या समुद्रात यंदाही मोठ्या लाटा उसळणार, पाहा संपूर्ण टाईमटेबल

यंदाच्या पावसाळ्यात समुद्रातील मोठ्या भरतीच्या तारखा मुंबई महानगर पालिकेने प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार मुंबईत तब्बल 28 वेळा मोठ्या लाटा उसळणार आहे.

मुंबईतल्या समुद्रात यंदाही मोठ्या लाटा उसळणार, पाहा संपूर्ण टाईमटेबल
| Updated on: Jun 11, 2019 | 9:43 AM
Share

मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात मुंबईच्या समुद्रात तब्बल 28 वेळा मोठी भरती येणार आहे. यावेळी समुद्रात 4.30 मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत. तर तब्बल 12 वेळा नीप टाइड येणार आहे. यामुळे समुद्राला मोठी भरती असताना नागरिकांनी समुद्राजवळ जाऊ नये असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

समुद्रात दर दिवशी भरती आणि ओहोटी असते. पावसाळ्यादरम्यान समुद्रात उंचंच उंच लाटा उसळतात. अशावेळी मुसळधार पाऊस असल्यास मुंबईच्या सकल भागात पाणी तुंबते. त्या दृष्टीने यंदाच्या पावसाळ्यात मुंबई महानगर पालिकेने समुद्रातील मोठ्या भरतीच्या तारखा प्रसिद्ध केल्या आहेत.

सर्वात मोठी भरती 1 सप्टेंबरला

यंदाच्या वर्षी समुद्रातील सर्वात मोठी भरती 1 सप्टेंबरला दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी असणार आहे. यावेळी 4.91 मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळणार आहेत. तर जुलै महिन्यात 5 तारखेला समुद्रात 4.79 मीटर उंच लाटा समुद्रात उसळतील. तसेच ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 3 ऑगस्टला दुपारी 1.44 मिनीटांनी समुद्रात 4.90 मीटरच्या लाटा उसळणार आहेत. त्याशिवाय ऑगस्ट महिन्याच्या शेवटी 31 तारखेला दुपारी 12.34 मिनीटांनी 4.90 मीटरच्या लाटा समुद्रात उसळतील असे पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात लिहीले आहे.

मान्सूनचे आगमनही लवकरच

महाराष्ट्राच्या उंबरठय़ापर्यंत येऊन ठेपलेला मान्सून येत्या दोन ते तीन दिवसात मुंबईसह महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मान्सूनच्या आगमनापूर्वी आज 11 आणि 12 जूनला अरबी समुद्रात वायू चक्रीवादळ येणार आहे. त्यामुळे अरबी समुद्र प्रचंड खवळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे.

७ जूनला नीप टाईड

यंदा पावसाळयात तब्बल 12 वेळा नीप टाईड येणार आहे. भरतीच्या वेळी असलेली लाटांची उंची आणि ओहोटीच्या वेळी असलेली लाटांची उंची यातला फरक जेव्हा अतिशय कमी असतो अशा परिस्थितीला ‘नीप टाईड’ म्हणतात. गेल्या काही वर्षांपासून नीप टाईड येण्याचे प्रमाण वाढले आहे. अशी परिस्थिती या पावसाळय़ात आठ वेळा येणार आहे. यंदा 25, 26,27 जून, 25, 26, 27  जुलै, 24, 25 ऑगस्ट, 7, 8 आणि 22, 23 सप्टेंबर या दिवशी समुद्रात नीप टाईड असणार आहे.

पाहा संपूर्ण टाईमटेबल

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.