AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! वातावरणात थेट बदल, आज दिवसभर राज्यात…

Maharashtra Weather Update : राज्यासह देशातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. काही भागात कडाक्याची थंडी पडली आहे. भारतीय हवामान विभागाने नुकताच राज्याबद्दल अत्यंत मोठा अंदाज वर्तवला आहे.

मोठी बातमी! वातावरणात थेट बदल, आज दिवसभर राज्यात...
Cloudy weather
| Updated on: Jan 21, 2026 | 7:52 AM
Share

राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. पाऊस, थंडी आणि उकाडा असे तिन्ही हंगाम बघायला मिळत आहेत. वातावरणातील बदलाचा थेट आपल्या आरोग्यावर परिणाम होत असून सर्दी, ताप, खोकला आणि श्वसनाशी संबंधित आजारही जाणवत आहेत. त्यामध्येच अनेक शहरांमध्ये सध्या वायू प्रदूषण हा मोठा मुद्दा बनलाय. मुंबई, दिल्ली या शहरांमध्ये अनेक उपायोजना करूनही वायू प्रदूषण काही कमी होत नाही. परिणामी लोकांना मास्क घालून फिरावे लागत आहे. दुसरीकडे उत्तरेकडे प्रचंड थंडी असून पारा घसरताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसात वातावरणात चढउतार बघायला मिळेल. राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडी होती. मात्र, त्या तुलनेत जानेवारी महिन्यात थंडी नाहीये. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसात थंडी वाढण्याची शक्यता आहे.

पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात मोठी घट झाली आहे तर पुढील दोन दिवस किमान व कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. त्यामुळे शहरात गारठा वाढला असून तो पुढील दोन दिवस कायम राहणारा असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. पुण्यात काही दिवसांपूर्वीच किमान तापमानात वाढ झाली होती. आता पुन्हा थंडी परतल्याचे चित्र आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीमध्ये मोठी वाढ होईल. काही भागात गारठा कमी होण्याचाही अंदाज आहे. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद निफाडमध्ये झाली. निफाडमध्ये 7.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गोदिंया येथे 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर धुळ्यात 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील गारठा सतत कमी जास्त होताना दिसत आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. ज्यामुळे दुपारच्यावेळी उकाडा जाणू शकतो. राज्यासह देशातही परिस्थिती सारखीच आहे. कधी पाऊस तर कधी थंडी अशी परिस्थिती अनेक भागात सध्या बघायला मिळत आहे. यादरम्यान नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

मुंबई शहर व उपनगराताल हवेच्या गिनवत्तेत सुधारणा झाली असून समीर ऍपच्या नोंदणीनुसार रविवारपासून शहराच्या सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक ‘समाधानकारक श्रेणीत नोंदला जात आहे. मंगळवारीदेखील शहरातील हवेने समाधानकारक श्रेणीचीच नोंद केली. यामुळे सध्या तरी मुंबईकरांना प्रदूषित हवेपासून दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या हवेत पुन्हा प्रदूषित हवेचा टक्का वाढला.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.