AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वादग्रस्त मुद्यावर राजकारण सोडा, अन्यथा काडीमोड; महायुतीमध्ये पहिली ठिणगी, अजितदादांच्या शिलेदाराचा भाजपाला थेट इशारा

Mahayuti BJP-NCP Dispute : ऐन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर अनेक घाडमोडींना वेग आला आहे. महायुतीमध्ये फटाके वाजत आहे. बटोंगे तो कटोंगे आणि एक है तो सेफ है या मुद्दांवर घरचा आहेर मिळाल्यानंतर आता मित्रपक्षांनी पण भाजपाचे कान टोचले आहे. वादग्रस्त मुद्यावर राजकारण सोडले नाही तर महायुतीत सहभागी न होण्याचा इशाराच अजितदादा गटाने दिला आहे.

वादग्रस्त मुद्यावर राजकारण सोडा, अन्यथा काडीमोड; महायुतीमध्ये पहिली ठिणगी, अजितदादांच्या शिलेदाराचा भाजपाला थेट इशारा
महायुतीत पहिली ठिणगी
| Updated on: Nov 15, 2024 | 10:21 AM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील अखेरच्या टप्प्याला आता सुरुवात झाली आहे. मतदानाला उणेपुरे पाच दिवस उरले आहेत. त्यातच भाजपाने हिंदुत्वाचे कार्ड खेळल्याने महायुतीमधील एक गट नाराज झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटोंगे तो कटोंगे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है असा नारा दिला. त्यावरून राज्यातील वातावरण ढवळून निघाले. मराठा-ओबीसी या वादाला काऊंटर करण्यासाठी हिंदुत्वाचे कार्ड खेळण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान महायुतीमधील अजितदादा गट या घोषणेवर नाराज आहे. अजितदादांनी महाराष्ट्रात अशा घोषणांची गरज नसल्याचे फटकारले. तर आता त्यांच्या जवळच्या एका शिलेदाराने भाजपाने वादग्रस्त मुद्यावर राजकारण सोडले नाही तर महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महायुतीमधील नाराजी थेट चव्हाट्यावर आली आहे. तर भाजपाची मोठी कोंडी झाल्याचे दिसत आहे.

बटेंगे तो कटेंगे

भाजपाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या आठवड्यात वाशीम येथील जाहीर सभेत बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा दिली होती. भाजपाने निवडणुकीत हिंदूत्व कार्ड खेळल्याचे मानले जात होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्याच प्रचार सभेत एक है तो सेफ है असा नारा दिला. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले. महाविकास आघाडीने या दोन्ही नाऱ्यावर सडकून टीका केली.

तर दुसरीकडे महायुतीच या घोषणेवरून ठिणगी पडली. अजितदादांनी या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. महाराष्ट्र हा शाहु-फुले-आंबेडकरांचा आहे. येथे शिवरायांची शिकवण आहे. साधु-संतांची पंरपरा आहे. राज्यात अशा वक्तव्याला थारा नसल्याचे त्यांनी जाहीर केले. तर दुसरीकडे भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी पण असेच वक्तव्य केले. त्यानंतर त्यांनी त्यावर खुलासा दिला. तर आता अजितदादांच्या शिलेदाराने थेट काडीमोड घेण्याचा इशारा दिला आहे.

नवाब मलिक यांचा थेट इशारा

मानाखूर्द-शिवाजीनगर या मतदारसंघात महायुतीतच टफ फाईट आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे नवाब मलिक या मतदारसंघातून मैदानात उतरले आहे. नवाब मलिक यांनी बटोंगे तो कटोंगे या नाऱ्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजपाने वादग्रस्त मुद्दावर राजकारण थांबवलं नाही तर आम्ही महायुतीच्या नवीन सरकारमध्ये नसू असा थेट इशाराच त्यांनी दिला. टीआयओला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्यांवर रोखठोक विचार मांडले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी