Maharashtra Breaking News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानदुखीचा त्रास, रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता 

| Updated on: Nov 09, 2021 | 12:15 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra Breaking News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानदुखीचा त्रास, रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता 
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Nov 2021 09:49 PM (IST)

    5101 दिव्यांनी उजळून निघाले भंडाऱ्यातील पवनी शहर

    भंडारा :5101 दिव्यांनी उजळून निघाले पवनी शहर

    पवनी शहरातील ऐतिहासिक पवनराजा परकोट किल्ल्यावर 5101 दिव्यांचा दीपोत्सव

    – विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील पवनी नगरात 5101 दिव्यांचा दीपोत्सव सोहळा साजरा

    यानिमित्त किल्ले निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

  • 08 Nov 2021 07:07 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रकृती अस्वास्थ्य, रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता 

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रकृती अस्वास्थ्य

    पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूंच्या दुखपतीचा त्रास बळवल्याची माहिती

    गेल्या आठवड्याभरापासून होतो आहे त्रास

    गेल्या सोमवारी गिरगावातील सर एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्र्यांनी केली होती आरोग्य तपासणी

    केल्या होत्या काही शारीरिक चाचण्या

    पुढील उपचारासाठी मुख्यमंत्र्यांना काही दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागण्याची शक्यता

    दिवाळी निमित्त ‘वर्षा’वर शुभेच्छांच्या भेटीगाठीही मुख्यमंत्र्यांनी टाळल्या

  • 08 Nov 2021 06:51 PM (IST)

    एस.टी. कर्मचारी संपाचा मुद्दा 'जैसे थे,' आजही हायकोर्टात संपावर तोडगा नाहीच

    मुंबई : एस.टी. कर्मचारी संपाचा मुद्दा 'जैसे थे'

    आजही हायकोर्टात संपावर तोडगा नाहीच

    कर्मचारी संपावर ठाम, राज्य सरकारचा अद्यादेश अमान्य

    संपकरी संघटना, राज्य सरकारसह सर्वांना आपली भूमिका प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश

    सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब

  • 08 Nov 2021 06:05 PM (IST)

    राज्यात सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपाला मनसेला पाठिंबा

    मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यात सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपाला पाठिंबा

    मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारवर केली जोरदार टीका

    सरकारचा गलथान कारभार सुरू

    आम्हाला वाटलं ठाकरे सरकार आहे, मात्र ते दोन्ही काँग्रेसमध्ये गुतले असून या सरकारच्या पापाचा घडा भरला आहे.

    मनसे नेते बाळा नांदगावकर  यांची टीका

  • 08 Nov 2021 05:48 PM (IST)

    नागपुरात भर वस्तीत असलेल्या नाल्यात आढळली मगर

    नागपूर : भर वस्तीत असलेल्या नाल्यात आढळली मगर

    - धरमपेठ परिसरातील नाल्यात आढळली मगर

    - स्थानिक मुलांनी मगरीचे फोटो काढले

    - वेणा नदीच्या पुरातून मगर नागपुरातील नाल्यात आल्याची शक्यता

    - वन विभागाच्या टीमकडून मगरीचा शोध सुरु

    - नाल्याशेजारी राहणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

  • 08 Nov 2021 05:28 PM (IST)

    शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांची घसरली जीभ, ग्रामसेवकांवर खालच्या भाषेत केली टीका

    औरंगाबाद ब्रेकिंग : सरपंच परिषदेत बोलताना शिवसेना आमदाराची घसरली जीभ

    शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांची घसरली जीभ

    राज्यातील ग्रामसेवकांबाबत केलं वादग्रस्त वक्तव्य

    सगळ्यात भामटे ग्रामसेवक असल्याचं केलं वक्तव्य

    तो कधी मूर्ख बनवेल सांगता येत नाही

    शिवसेना आमदारांच्या धक्कादायक वक्तव्यामुळे खळबळ

    राज्यातील ग्रामसेवकांवर खालच्या भाषेत केली टीका

  • 08 Nov 2021 05:18 PM (IST)

    नगरमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या विरोधात कारवाई करण्याचा ठराव 

    अहमदनगर : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या विरोधात कारवाई करण्याचा ठराव

    जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेतला ठराव

    जिल्हा रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीच्या घटनेबरोबरच इतर काही तक्रारी होत्या

    त्यानुसार हा ठराव करण्यात आल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

  • 08 Nov 2021 05:11 PM (IST)

    नारायण राणे राजभवनात दाखल, राज्यपालांची भेट घेणार

    मुंबई : नारायण राणे राजभवन येथे पोहोचले

    राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी नारायण राणे राजभवनात दाखल

  • 08 Nov 2021 04:58 PM (IST)

    अडीच तास उलटूनही प्रभाकर साईलची अद्याप चौकशी सुरूच

    मुंबई - अडीच तास उलटूनही प्रभाकर साईलची अद्याप चौकशी सुरूच

    - CRPF कॅम्प ऑफिसमध्ये एनसीबीची टीम करतीये चौकशी

    - प्रभाकर साईलसोबत वकील तुषार खंदारे आहेत हजर

  • 08 Nov 2021 04:56 PM (IST)

    एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीचा इंदापूरमध्ये रास्तारोको 

    पुणे : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीचा इंदापूरमध्ये रास्तारोको

    इंदापूर शहरातील पुणे- सोलापूर महामार्गावर बसस्थानकासमोर आंदोलन सुरू

    मागण्या मान्य न केल्यास आंदोलन व्यापक करण्याचा दिला इशारा

    आंदोलन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त

  • 08 Nov 2021 12:49 PM (IST)

    ST Bus Strike in Maharashtra : एसटीचा प्रश्न चिघळायला राज्य सरकार कारणीभूत, विखे पाटलांची टीका

    एसटी महामंडळाचा प्रश्न चिघळलाय यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार कर्मचाऱ्यांशी किमान संवाद साधणं गरजेचं आज महामंडळ आणि कर्मचारी वा-यावर कर्मचाऱ्यांची मागणी काय आजची नाही मंत्री तुपाशी आणि कर्मचारी उपाशी अशी अवस्था कर्मचाऱ्यांशी तात्काळ संवाद सुरू करा मुलभुत मागण्या मान्य करून राज्यातील जनतेचे हाल थांबवा भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी हे सरकारला जबाबदारी झटकण्याच्या कामाचं काही घडलं की केंद्राकडे बोट दाखवलं जातं जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी नवाब मलिक दररोज पत्रकार परिषदा घेतात राधाकृष्ण विखे पाटील यांची आघाडी सरकारवर टीका

  • 08 Nov 2021 12:44 PM (IST)

    भाजपचे किरीट सोमय्या यांच्याविरोधात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे न्यायालयात

    भाजपचे किरीट सोमय्या यांच्या विरोधात काँग्रेस चे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे न्यायालयात,

    वृत्त वाहिनीवरील चर्चासत्रात काँग्रेस पक्षावर निराधार आरोप करत बदनामी केल्याचा आरोप,

    नागपूरच्या जिल्हा न्यायालयात दिवाणी आणि फौजदारी मानहाणीचा दावा,

    सोमय्या यांच्या विरोधात 1 रुपया मानहाणीचा दावा,

    यापूर्वी अतुल लोंढे यांनी सोमय्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे आधीच केली आहे तक्रार

  • 08 Nov 2021 12:15 PM (IST)

    होय, मला क्रूझ पार्टीचं आमंत्रण होतं : मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख

    मी मुंबईचा पालकमंत्री, अनेक कार्यक्रमांची निमंत्रण येत असतात काशिफने मला क्रूझ पार्टीचं आमंत्रण दिलं होतं जिकडे जायचं नाही त्याची मी माहिती घेत नाही ड्रग्ज प्रकरणातील सर्व पुरावे नवाब मलिक यांनी मीडियासमोर ठेवलेत काशिफने मला निमंत्रण दिलं, त्याने मला फोन केला होता, पण मी त्याला ओळखत नाही आमंत्रणापाठीमागचा कट काय, त्याचा तपास यंत्रणांनी शोध घ्यावा या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं काम सुरु गुजरातमध्ये मिळालेल्या 4 हजार कोटींच्या ड्रग्जचं काय झालं हा देश सरकार चालविणार की उद्योगपती क्रूझ पार्टीला परवानगी देण्याचं काम राज्य सरकारचं नाही सुशांत सिंग प्रकरणाचं पुढे काय झालं कोर्टात व्हॉट्सअॅप चॅट ग्राह्य धरत नाही, पुरावा धरत नाहीत मग फक्त चॅटच्या आधारावर अटक कशी काय?

  • 08 Nov 2021 11:45 AM (IST)

    कंगना, सुरेश वाडकर, अदनान सामी, PV सिंधू यांना पुरस्कार प्रदान

    सुषमा स्वराज, अरुण जेटली, जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार

  • 08 Nov 2021 11:40 AM (IST)

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कार वितरण

    141 जणांना पद्म पुरस्कार प्रदान

    राष्ट्रपती भवनात पुरस्कार वितरण

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

    उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह उपस्थित

  • 08 Nov 2021 11:39 AM (IST)

    आर्यन खानच्या सुटकेसाठी उद्धव ठाकरे मलिक आणि वळसे पाटलांबरोबर बैठक घेतात : पडळकर

    आर्यन खानची सुटका व्हावी यासाठी मुख्यमंत्री तात्काळ नवाब मलिक आणि गृहमंत्र्यांसोबत मिटींग घेतात. पण एसटी कर्मचाऱ्यांसाठी त्यांना चर्चा करायलाही वेळ नाही, असा गंभीर आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

  • 08 Nov 2021 10:19 AM (IST)

    NCB चे DDG ज्ञानेश्वर सिंग मुंबई एयरपोर्टवर उतरले, अडीज वाजता प्रभाकर साईलची चौकशी करणार

    NCB चे DDG ज्ञानेश्वर सिंग मुंबई एयरपोर्टवर उतरले,

    अडीज वाजता प्रभाकर साईलची चौकशी करणार

    ज्ञानेश्वर सिंह म्हणाले,गरज पडली तर संबंधित लोकांना चौकशीसाठी बोलविणार

  • 08 Nov 2021 10:09 AM (IST)

    सीमेवर चीनने गावं वसवली, जमत असेल तर त्यांना उखडा, संजय राऊत यांचं जेपी नड्डा यांना प्रत्युत्तर

    प्रयत्न करुनही मविआ सरकार पाडणं शक्य झालं नाही वैफल्य येणं स्वाभाविक आहे सीमेवर चीनने गावं वसवली, जमत असेल तर त्यांना उखडा संजय राऊत यांचं जेपी नड्डा यांना प्रत्युत्तर

  • 08 Nov 2021 10:00 AM (IST)

    औरंगाबादच्या लेबर कॉलनीवर आज पडणार हातोडा

    औरंगाबादच्या लेबर कॉलनीवर आज पडणार हातोडा

    घरे पडण्याच्या भीतीने लेबर कॉलनीतील लोकांची रस्त्यावर गर्दी

    घरे पडण्याच्या निर्णयाला लेबर कॉलनीतील नागरिकांचा तीव्र विरोध

    आज दहा वाजेपर्यंत घरे खाली करण्याचा शासनाने दिलाय अलटीमेटम

    महिला मुला बाळांसह नागरिक उतरले रस्त्यावर

  • 08 Nov 2021 09:25 AM (IST)

    क्रांती रेडकर यांच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस : नवाब मलिक

    क्रांती रेडकर यांच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस पुण्यात ड्रग्जप्रकरण प्रलंबित समीर वानखेडे यांनी उत्तर देण्याचं मलिकांचं आव्हान

  • 08 Nov 2021 09:17 AM (IST)

    बाळा नांदगावकर नगरच्या सरकारी रुग्णालयाला भेट देणार

    मनसे नेते मा. बाळा नांदगावकर साहेब हे अहमदनगर जिल्हा रुग्णालयास आज दिनांक 8-11-2021 रोजी सकाळी 11-00 वाजता भेट देऊन जखमींची भेट घेणार आहेत

  • 08 Nov 2021 08:36 AM (IST)

    मोदी-ठाकरे-गडकरी कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे पंढरपूर पालखी मार्गाचे चौपादरीकरण भूमिपूजन व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी 3.30 वाजता कार्यक्रमात सहभागी होणार

  • 08 Nov 2021 08:12 AM (IST)

    स्वारगेट बस डेपोत कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी, सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

    स्वारगेट बस डेपोत कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी,

    सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी,

    जिल्ह्यातील 13 डेपो राहणार आज बंद,

    लांब पल्ल्याच्या गाड्या फक्त सुरू,

    जिल्हा अंतर्गत प्रवासी सेवा राहणार बंद

  • 08 Nov 2021 07:56 AM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये दिवाळीच्या 4 दिवसात 37 चोरीच्या घटना

    पिंपरी चिंचवड शहरात दिवाळीच्या चार दिवसामध्ये शहरात विविध ठिकाणी 37 चोरीच्या घटना घडल्यात यामध्ये दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी, मोबाईल, पैसे, दागिन्यांची चोरी झाली आहे

    -या सर्व घटनांमध्ये तब्बल 25 हजार 86 हजार 247 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे

    -भोसरी, सांगवी, चिंचवड, निगडी, पिंपरी, देहूरोड, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या 12 घटनांमध्ये दोन लाख 92 हजार 297 रुपये किमतीचे 17 मोबाईल फोन चोरट्यांनी चोरून नेले आहेत

    -तर निगडी, चाकण, एमआयडीसी भोसरी, हिंजवडी, भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सहा घटनांमध्ये जबरी चोरी आणि घरफोडी च्या घटना समोर आल्यात त्यात 17 लाख 61 हजार 500 रुपयांचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेलेत

  • 08 Nov 2021 07:33 AM (IST)

    अहमदनगर जिल्ह्यात रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर पुणे प्रशासन अलर्टवर, जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली

    अहमदनगर जिल्ह्यात रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर पुणे प्रशासन अलर्टवर,

    जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील फायर ऑडीटचा आढावा घेण्यासाठी बोलावली बैठक,

    बैठकीत जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयातील फायर ऑगीटचा घेणार आढावा,

    फायर ऑडीटचा अहवाल सादर केला जाण्याची शक्यता ...

    अग्निशमन दलाचे अधिकारी, पीएम आरडीएच्या अधिकाऱ्यांनाही उपस्थित राहण्याच्या सूचना

  • 08 Nov 2021 07:26 AM (IST)

    सहकारी संस्थांच्या निवडणुका ईव्हीएम मशीनवरती होणार

    राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ईव्हीएम मशीनवरती होणार

    सहकारी निवडणूक प्राधिकरणानं राज्य शासनाकडे ईव्हीएम खरेदीसाठी मागितला 9 कोटीचा निधी,

    राज्य शासनानं ईव्हीएम खरेदीसाठी दाखवली,

    सहकारी संस्थांच्या निवडणूकीचा निकाल मिळणार अवघ्या काही तासात,

    सहकारी संस्थांच्या निवडणूका या मतपत्रिकेद्वारे होत असल्याने मतमोजणीला काही ठिकाणी दोन दिवस लागायचे,

    मात्र आता राज्य शासनाने ईव्हीएम खरेदी करण्याची तयारी दर्शवल्यानं सहकारी संस्थांच्या निवडणूका या ईव्हीएमवरती होणार

  • 08 Nov 2021 07:24 AM (IST)

    कोरोना नियमांबाबत शासनाची मनमानी, नाशिकच्या मंदिरांना नियम कडक, मॉलमध्ये मात्र गर्दी

    नाशिक - कोरोना नियमांबाबत शासनाची मनमानी

    शहरातील मंदिरांना नियम कडक, मॉल मध्ये मात्र गर्दी

    अनेक मंदिरात लहान मुलांना प्रवेश नाही

    देवदर्शनासाठी येणाऱ्या पालकांना नवीन डोकेदुखी

    पण मॉल मध्ये मात्र सर्वांना सर्रास प्रवेश

    फायद्याचा विचार करूनच मॉल कडून नियमांची मोडतोड सुरू असल्याचा आरोप

  • 08 Nov 2021 07:23 AM (IST)

    पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळाला नागरिकांचा विरोध असलेल्यानं भूसंपादनाची प्रक्रिया रखडली

    पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळाला नागरिकांचा विरोध असलेल्यानं भूसंपादनाची प्रक्रीया रखडली,

    पर्यायी दोन जागांचा अहवाल संरक्षण मंत्रालयाला देऊनही अद्याप त्यावरती निर्णय झालेला नाहीये,

    येत्या दोन महिन्यांत अंतिम मंजुरीनंतर भूसंपादनाला सुरुवात होण्याची शक्यता,

    पुरंदर तालूक्यातील पाच आणि बारामती तालुक्यातील तीन अशा एकुण आठ गावातील 3 हजार हेक्टर जिरायती जमीन संपादित करता येऊ शकते असं संरक्षण मंत्रालयास कळवण्यात आलंय

  • 08 Nov 2021 07:21 AM (IST)

    नागपूरचा संकल्प गुप्ता ठरला भारताचा नवा ग्रँड मास्टर

    नागपूर चा संकल्प गुप्ता ठरला भारताचा नवा ग्रँड मास्टर

    18 वर्षीय संकल्प ने 71 व ग्रँड मास्टर होण्याचा मान पटकावला

    सर्बियात राउंड रॉबिन पद्धतीने झालेल्या स्पर्धेत अवघ्या 22 दिवसात तिन्ही नार्म मिळवत ग्रँडमास्टर 'किताब मिळविला

    नागपूरला एक नवा मान

  • 08 Nov 2021 07:19 AM (IST)

    नाशिक - दिवाळी काळात शहरात चोरीच्या घटना वाढल्या

    नाशिक - दिवाळी काळात शहरात चोरीच्या घटना वाढल्या

    दिवाळीच्या दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण सात लाख रुपयांची चोरी

    दिवाळी दरम्यान शहरात घरफोडी,वाहनचोरी च्या घटना

    नागरिकांना मनस्ताप, चोरट्यांची मात्र दिवाळी

    तर लक्ष्मीपूजना साठी ठेवलेली सुमारे 2 लाख रुपयांच्या दागिन्यांची देखील चोरी

    तर भाऊबीजेला बाहेर निघालेल्या महिलेच्या पर्स मधून 1 लाखांच्या दागिन्यांची चोरी

    शहर पोलिसांच्या दिवाळी पूर्व नियोजनावर मात्र प्रश्नचिन्ह

  • 08 Nov 2021 07:18 AM (IST)

    एनसीबीचे डेप्युटी डायरेक्टर ज्ञानेश्वर सिंग मुंबईकडे रवाना, आज प्रभाकर साईलचा जबाब नोंदविला जाणार

  • 08 Nov 2021 07:15 AM (IST)

    एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत आज उच्च न्यायालयाय सुनावणी

    एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत आज उच्च न्यायालयाय सुनावणी,

    काल पुण्यातील बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही,

    आज मुंबईत एसटी कृती समितिची बैठक,

    बैठकीत संपाबाबत ठोस भूमिका ठरणार,

    न्यायालयाच्या निकालाकडेही सगळ्यांच लक्ष,

    पुणे जिल्ह्यांतर्गत वाहतूक प्रवासी सेवा बंद ठेवण्याचं कर्मचाऱ्यांच एसटी वाहतूक नियंत्रकांना पत्र

  • 08 Nov 2021 07:14 AM (IST)

    नागपूरमध्ये सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं

    सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं , मात्र उलगडा फक्त 28 टक्के गुन्ह्यांचं

    गेल्या 2016 पासून2020 पर्यन्त 793 हुन जास्त गुन्ह्यांची नोंद

    मात्र या पैकी फक्त 28 टक्केम्हणजे 2 29 गुन्ह्यांचा झाला उलगडा

    यात जास्तीत जास्त प्रकरण फसवणुकीची आहेत

    ओटीपी च्या फंड्यातून साडे आठ कोटी रुपयांचा घातला गंडा

    माहिती अधिकारातून पुढे आली माहिती

  • 08 Nov 2021 06:23 AM (IST)

    पंढरपूरला जोडणाऱ्या अन्य महामार्गांचे लोकार्पण

    भूमिपूजन समारोहावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंढरपूरला जोडणाऱ्या 223 किलोमीटरपेक्षा अधिक पूर्ण झालेले आणि सुधारित रस्ते प्रकल्पाचं लोकार्पण करतील. त्याची अंदाजे किंमत 1 हजार 180 कोटी रुपये असणार आहे. यात म्हसवड-पिलिव-पंढरपूर (NH-548E), कुर्डूवाडी-पंढरपूर (NH-965C), पंढरपूर-सांगोला (NH-965C), त्याचबरोबर NH-561A चा टेंभुर्णी-पंढरपूर विभाग आणि पंढरपूर-मंगळवेळा-उमदी विभागाचा समावेश असेल.

  • 08 Nov 2021 06:22 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पालखी मार्गांचे भूमिपूजन

    वारकरी संप्रदायासाठी उभारण्यात येत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही मार्गाच्या चौपदरीकरणाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी विशेष समर्पित पदपथ बांधला जाणार आहे.

Published On - Nov 08,2021 6:20 AM

Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.