Maharashtra Corona update : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पोलीस दलाचं मोठं नुकसान, 4 महिन्यात तब्बल 95 पोलिसांचा मृत्यू

कोरोनाचा दुसऱ्या लाटेत राज्यातील पोलीस दलाचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, गेल्या 4 महिन्यात तब्बल 95 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

Maharashtra Corona update : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पोलीस दलाचं मोठं नुकसान, 4 महिन्यात तब्बल 95 पोलिसांचा मृत्यू
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र पोलीस दलाचं मोठं नुकसान

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली कोरोना रुग्णांची वाढती संख्या कमी होताना पाहायला मिळत नाही. अशावेळी कोरोना रुग्णांचं मृत्यूचं प्रमाणही चिंता वाढवणारं आहे. दरम्यान, कोरोनाचा दुसऱ्या लाटेत राज्यातील पोलीस दलाचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, गेल्या 4 महिन्यात तब्बल 95 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (95 policemen in Maharashtra died due to corona in last 4 months)

तरुण पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूने चिंता वाढली

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस कर्मचारी जिवाची बाजी लावून अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, कर्तव्य पार पाडत असताना कोरोनामुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू होत आहे. भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मार्च 2020 पासून सुरु झाला. तेव्हापासून आतापर्यंत तब्बल 427 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात 2020 मध्ये 332 पोलिसांचा कोरोनामुळे जीव गेला. तर गेल्या 4 महिन्यात 95 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

एप्रिल महिन्यात 64 पोलिसांचा कोरोनामुळे जीव गेला

2021 च्या सुरुवातीला कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं प्रमाण कमी होतं. पण एप्रिल महिन्यात तब्बल 64 पोलिसांचा कोरोनामुळे जीव गेलाय. तर मे महिन्याच्या सुरुवातीच्या 2 दिवसांत 5 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये तरुण पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त असल्यामुळे पोलीस दलासमोर नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

2021 मध्ये जानेवारी ते मार्च महिन्यात पोलिसांच्या मृत्यूच प्रमाण नियंत्रणात होतं. मात्र, एप्रिल महिन्यात करोनाची दुसरी लाट आली. या दुसऱ्या लाटेत 64 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर मे महिना आता सुरू झाला आहे. मे महिन्याच्या 2 दिवसात 5 पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर करोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलीस दलाच मोठं नुकसान होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

2021 मध्ये पोलिसांच्या मृत्यूचं प्रमाण

जानेवारी – 12 पोलिसांचा मृत्यू फेब्रुवारी – 2 पोलिसांचा मृत्यू मार्च – 12 पोलिसांचा मृत्यू एप्रिल – 64 पोलिसांचा मृत्यू मे – 5 पोलिसांचा मृत्य (2 दिवसात)

एप्रिल महिन्यात कोरोनामृतांची संख्या 25 टक्क्यांनी वाढली

महाराष्ट्रात गेल्या एप्रिल महिन्यात कोरोना मृतांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. गेल्या एकट्या एप्रिल महिन्यात कोरोना मृतांच्या संख्येत 25 टक्के वाढ पाहायला मिळत आहे. तर नव्याने निदान बाधित होणाऱ्यांची संख्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 2 लाख 80 हजार इतकी झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने एप्रिल महिन्यात उच्चांक गाठला असून बाधितांची संख्या 57 टक्क्यांना वाढली आहे. एकीकडे बाधितांच्या प्रमाणात मृत्यूदरात घट झाली असली तरी मृतांच्या संख्येत मात्र या महिन्यात 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यात राज्यात सध्या सर्वाधिक मृत्यूदर सोलापूरचा असून जवळपास 4 टक्के इतका आहे. तर सिंधुदुर्ग, परभणी, नंदुरबार, अहमदनगर येथे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्याखालोखाल भिवंडी नगरपालिका(3.77 टक्के), सांगली(2.86 टक्के), कोल्हापूर(2.83 टक्के ), सिंधुदुर्ग (2.62 टक्के), मालेगाव(2.28 टक्के), उस्मानाबाद (2.30 टक्के), रत्नागिरी(2.15 टक्के), नांदेड (2.27 टक्के), सातारा(2.19 टक्के) आणि मुंबई(2.02 टक्के) यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona | राज्यात दिवसभरात 669 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, 56 हजार 647 नवे कोरोनाबाधित, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

कोरोना रुग्णांना मोठा दिलासा; ऑक्सिजन बेडसाठी केंद्राने घेतला ‘हा’ निर्णय

95 policemen in Maharashtra died due to corona in last 4 months

Published On - 3:08 pm, Mon, 3 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI