Mumbai : दोन महिन्याचं बिल पाहून रुग्णालयात दाखल करण्याची वेळ, तुम्हीही रक्कम पाहू हादराल

तुम्ही थोडा विचार कर जर तुम्हाला घराचं बिल 80 कोटी रुपये आलं तर ? आपल्या सर्वसामान्यांच्या पायाखालची जमिन सरकेल असा हा प्रकार सत्यात समोर आला आहे.

Mumbai : दोन महिन्याचं बिल पाहून रुग्णालयात दाखल करण्याची वेळ, तुम्हीही रक्कम पाहू हादराल
MSEDCL Wrong correction

मुंबई : अनेक वेळा वाढीव वीजबिल आल्यामुळे नागरिकांना घाम फुटल्याचं आपण पाहिलं आहे. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुम्ही थोडा विचार कर जर तुम्हाला घराचं बिल 80 कोटी रुपये आलं तर ? आपल्या सर्वसामान्यांच्या पायाखालची जमिन सरकेल असा हा प्रकार सत्यात समोर आला आहे. (maharashtra elderly man taken to hospital after getting 80 crore electricity bill)

नालासोपारा परिसरात एका वयस्कर व्यक्तीला 80 कोटींचं बिल दिलं गेलं आहे. हातात आलेलं बिल पाहून त्यांना मोठा धक्का बसला आणि अचानक त्यांची तब्येत बिघडली. यावेळी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलं. मीडिया रिपोर्टनुसार, या वृद्ध व्यक्तीचं नाव गणपत नाईक आहे.

दोन महिन्यांचं बिल 80 कोटी

खरंतर, एवढी मोठी रक्कम पाहून हे 10-12 वर्षांचं बिल आहे असं तुम्हाला वाटेल पण अवघ्या दोन महिन्यांचं बिल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणपत नाईक एक छोटी भात गिरणी चालवतात. लॉकडाऊनमुळे त्यांना आधीच खूप त्रास सहन करावा लागला. अशा परिस्थितीत हे बिल पाहून त्याचे संपूर्ण कुटुंब चक्रावले आहे.

वीज कंपनीकडून झाली चूक

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने (MSEDCL) म्हटलं आहे कीस गणपतच्या बिलामध्ये एक छोटीशी चूक झाली आहे. ज्यामुळे कंपनीने त्यांना सहा अंकीऐवजी नऊ-अंकी बिल पाठवलं. यामध्ये तात्काळ बदल करून योग्य ते बिल त्यांच्याकडे सोपवू असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. (maharashtra elderly man taken to hospital after getting 80 crore electricity bill)

संबंधित बातम्या – 

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद, शिवसेना नेत्याच्या मुलाचा विवाह साधेपणाने पार पडणार

Pooja Chavan Case : कुठं कुठं जायाचं? कुलू, मनाली, शिमला, गबरुशेठची एन्ट्री आणि मंत्री महोदय, आणखी एक Audio clip

औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की; संजय राऊतांचा ठाम पवित्रा

मुंबईत लोकल ट्रेन पुन्हा बंद होणार का, रेल्वेचे अधिकारी म्हणतात..

(maharashtra elderly man taken to hospital after getting 80 crore electricity bill)

Published On - 3:24 pm, Wed, 24 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI