Anil Deshmukh Resignation Live Updates : अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची शक्यता

| Updated on: Apr 05, 2021 | 7:44 PM

Anil Deshmukh Resignation Live Updates : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Anil Deshmukh Resignation Live Updates : अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची शक्यता
अनिल देशमुख, नेते, राष्ट्रवादी

Anil Deshmukh Resignation Live Updates : मुंबई :  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले असून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देणार आहेत. अ‌ॅड.जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टानं अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देत सीबीआयला तपास करण्याचे आदेश दिले. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. ( Maharashtra home minister Anil Deshmukh resign live updates mumbai high court jaishri patil parambir singh plea Uddhav Thackeray Sharad Pawar Manshukh Hiren death ambani bomb scare )

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Apr 2021 05:48 PM (IST)

    फडणवीसांचं सरकार असताना ते न्यायाधीश होऊन निर्णय घ्यायचे: नाना पटोले

    मुंबई हायकोर्टाचा निर्णय आला त्यानंतर राजीनामा झाला हे आम्ही स्वीकारतो, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. परमबीर सिंग यांचे आरोप आणि त्याची वस्तुस्थिती समोर यावी म्हणून निवृत्त न्यायाधीश समिती आम्ही नेमली होती. फडणवीस सरकार असताना ते न्यायाधीश होऊन निर्णय घ्यायचे,कोणती व्यवस्था होती,कोणत्या अधिकारात ते करायचे आज गृहमंत्री राजीनामा झाला ते आम्ही स्वीकारले आहे, असं नाना पटोले म्हणाले.

  • 05 Apr 2021 05:46 PM (IST)

    चौकशी निष्पक्षपातीपणे व्हावी म्हणून अनिल देशमुखांचा राजीनामा

    चंद्रपूर:गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया, हायकोर्टाच्या आदेशानंतर सीबीआय चौकशीला सुरुवात झाली आहे, चौकशीदरम्यान गृहमंत्री स्वतः पदावर असणे नैतिकदृष्ट्या योग्य नव्हते, चौकशी निष्पक्षपातीपणे व्हावी यासाठीच हा राजीनामा आहे, ही चौकशी योग्य प्रकारे होणार आहे, त्यातून वस्तुस्थिती आणि सत्य बाहेर येईल, असं वडेट्टीवार म्हणाले.

  • 05 Apr 2021 05:34 PM (IST)

    वस्तूस्थिती सांगावी लागेल म्हणून, देशमुखांचा राजीनामा- नारायण राणे

    अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. त्यानंतर भाजप नेते नारायण राणे हे पत्रकार परिषद घेत आहेत. ते महावकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत. सीबीआयची चौकशी झाल्यामुळे देशमुख यांना वस्तुस्थिती सांगावी लागेल म्हणून त्यांनी राजीनामा दिला, असं राणे म्हणाले.

    या प्रकरणात सत्य समोर येईल. या प्रकरणामुळे अनेकजण भयभित झाले आहेत. प्रतिक्रियासुद्धा देत नाहीयेत. मुख्य जबाबदार व्यक्ती असताना ज्या व्यक्तीने वाझे यांना पोलीस दलात घेतलं. वाझेला अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या, ते राज्यातील मुख्यमंत्री गप्प आहेत. त्यांचा या प्रकरणात सहभाग आहे का? असा सवाल त्यांनी केला. तसेच ठाकरे जर बोलत नसतील तर मी असं समजतो की त्यांचीसुद्धा या प्रकरणामध्ये इन्हॉल्वमेंट आहे. त्यांच्या आशिर्वादाशिवाय बदल्यांमध्ये पैसै, दुकानदारांकडून पैसै उकळण्यासाठी शक्य नाही.

    म्हणूनच मला वाटते की देशमुख यांनी सीबीआयला घाबरुन राजीनामा दिला आहे. या सर्व प्रकरणात मुख्यमंत्री जबाबदार आहेत. त्यांनी सचिन वाझे यांना अटक करण्यास व्यत्यय आला. परमबीर यांनी दिलेल्या प्रत्रालासुद्धा ठाकरे यांनी उत्तर दिलं नाही. हे राज्य कुठे चालले आहे. छत्रपतींचे हे राज्य कुठे चालले आहे. आतापर्यंत दोन मंत्री गेले. कोणत्याही मंत्र्याची चौकशी झाली तर राजीनामा द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे.

    आपण लायक नाही आहोत हे यांना समजलं पाहीजे. उद्या सरकार जाणार आहे, त्यामुळे आताच कमवून घ्या असं प्रत्येक मंत्र्याला वाटत आहे. बाकीच्या शिवसेनेच्या नेत्यांना बाजूला सारून हे मुख्यमंत्री झाले. यांचा राज्याचा विविध खात्याचा अभ्यास नाही. त्यांना कळत नाही. आज कुठल्या जिल्ह्याला पैसै मिळत आहेत?,  त्यांनी उद्या नाही तर आजच राजीनामा द्यावा.

    राज्यात मोठे गुन्हे घडतात याची माहिती मुख्यमंत्र्यांना असते. राज्या काय चाललं आहे, कोणता अधिकारी भ्रष्टाचार करतोय याची माहिती सकाळी मुख्यमंत्र्यांना दिली जाते. वाझे कसा आहे, याची माहिती त्यांना द्यायला पाहिजे का?

    माझा सीबीआयवर विश्वास आहे. सत्य ते बाहेर येईल. त्यांचे बाहेरचे दिवस संपले, आता त्यांचे आतले दिवस आले आहेत. अनिल देशमुख दिल्लीत सुप्रिम कोर्टात गेले की प्रफुल्ल पटेलांच्या घरी गेले. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे नेते आहे. आपण महाराष्ट्राचं नाव नेलं हा पराक्रम सांगण्यासाठी देशमुख पटेलांकडे गेले असतील.

    काँग्रेसला काहीही अस्तित्व नाही. काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीची भीती आहे. बदनाम झालं तर काँग्रेस बदनाम होईल मात्र, आपल्याला मंत्रिपद उपभोगता यायला हवा असं येथील काँग्रेसच्या नेत्यांच मत आहे. आघाडीच्या दोन नेत्यांनी राजीनामे दिले. हे दोन्ही प्रकरण राज्याला बदनाम करणारे आहेत. मला वाटतं हे सरकार लवकरच  जाईल, असे राणे म्हणाले.

  • 05 Apr 2021 05:31 PM (IST)

    अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची शक्यता

    अनिल देशमुख हे मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची शक्यता आहे. ते सुप्रीम कोर्टात मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात दाद मागतील, अशी शक्यता आहे.

  • 05 Apr 2021 05:29 PM (IST)

    राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख दिल्लीकडे रवाना

    मुंबई: मुंबई हायकोर्टानं परमबीर सिंग यांच्या आरोपांवर जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला.  राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

  • 05 Apr 2021 04:51 PM (IST)

    सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील म्हणजे 'दुरुस्त आये ' म्हणणे शक्य तरी होईल., पंकजा मुंडेंचे ट्विट

  • 05 Apr 2021 04:25 PM (IST)

    अनिल देशमुख मुंबई विमानतळाकडे रवाना, नागपूरला जाण्याची शक्यता

    मुंबई: अनिल देशमुख मुंबई विमानतळाकडे रवाना झाले आहेत. ते नागपूरला जाण्याची शक्यता आहे. नागपूरच्या निवासस्थानी रवाना होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख  माध्यमांशी देखील न बोलता देशमुख रवाना झाले.

  • 05 Apr 2021 03:57 PM (IST)

    केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचा महाराष्ट्र सरकारवर निशाणा

    केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावरुन महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला, उद्धव ठाकरे शांत आहेत, असं रवीशंकर म्हणाले.

  • 05 Apr 2021 03:45 PM (IST)

    अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या निवासस्थानी शुकशुकाट

    नागपूर: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे.  त्यांच्या नागपूरच्या निवासस्थानी कोणत्याही प्रकारच्या हालचालीं  नाही. ज्या प्रमाणे पोलीस बंदोबस्त असतो तो त्याच प्रमाणे आहे. देशमुख यांच्या घरा समोर शुकशुकाट  पाहायला मिळते आहे.
  • 05 Apr 2021 03:42 PM (IST)

    एवढं सारं झालं, मुख्यमंत्री अजूनही गप्प का- देवेंद्र फडणवीस

    अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद घेत आहेत. या सरकारकडे नैतिकता शिल्लक आहे का हे विचारावं लागेल, असे ते म्हणाले. हा राजीनामा झाला असला तरी आजूनही एका गोष्टीचं कोडं मला पडलं आहे. इतक्या भयावह घटना राज्यात झाले. कधी नव्हे तेवढे आरोप मंत्र्यांवर लागले. मात्र, अजूनही मुख्यमंत्री अजूनही बोलत नाहीतेय. अजूनही मुख्यमंत्री शांत आहेत. हे अस्वस्थ करणारं आहे. त्यांची प्रतिक्रिया यायला हवी होती. त्यांची शेवटची प्रतिक्रिया मला आठवतेय. ते म्हणाले होते, की वाझे काय लादेन आहे का?, त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर अजूनही मुख्यमंंत्री का बोलत नाहीत, हा माझा सवाल आहे. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. मुख्यमंत्र्यांनी लोकांना आश्वस्त करायचं असतं. त्यांनी चूक सुधारु असं सांगणं अपेक्षित आहे, असे फडणवीस म्हणाले.

    नैतिकता आधीच आठवायला हवी होती. मात्र, नैतिकता कधीजरी आठवली तरी त्यांच स्वागतच केलं पाहीजे, असंही फडणवीस म्हणाले. जेव्हा एखाद्या सिटींग गृहमंत्र्यावर चौकशी होत असेल तर त्या व्यक्तीला त्या पदावर राहता येत नाही. देशमुख यांच्याकडे राजीमाना देण्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून त्यांनी राजीनामा दिला. या सरकारमध्ये नैतिकता शिल्लक आहे का हा प्रश्न विचारावा लागेल. याचं कारण म्हणजे, ज्या प्रकारे संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर तसेच आधी पोलिसांचा जो व्यवहार दिसतोय, त्याकडे पाहूनच सीबीआयने देशमुखांचे प्रकरण हे सीबीआयकडे दिले आहे.

    देशमुखांच्या प्रकरणात सरकारचा पूर्ण बचाव फोल ठरला आहे. मी अतिरंजित बोलत नाही. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. मी कायद्याच्या पदवीधर असल्यामुळे मी योग्य तेच बोलतो. या पूर्ण प्रकरणामध्ये माझी भूमिका पाहिली तर मी पूर्ण कायद्याचा आधार घेऊन बोलत होते. मला उत्तर देणारे मला टोलवाटोलवीचे उत्तरं देत होते. मी पुराव्यासहीत ज्या गोष्टी मांडत होते, त्या सर्व कोर्टाने स्वीकारल्या आहेत. याचं मला समाधान आहे.

    देशमुखांची विनाकारण पाठराखण करण्यात आली. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर ते खातं आता मुख्यमंत्र्याकडे जाणार. त्यानंतर आता सरकारमधील तीन पक्ष गृहमंत्रिपद कोणाकडे द्यायचं ते ठऱवतील. जर गृहमंत्रिपदाचा भार सोपण्यात उशीर केला गेला तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अडचणीची ठरु शकते.

    मी आधीच म्हणालो होतो की, हे जनतेच्या मनातील सरकार नाहीये. हे बेईमानीने आलेले तीन पायाचे सरकार आहे. दीड वर्षानंतर त्याचा अनुभव आता जनता घेत आहे. या राज्यामध्ये एका मुख्यमंत्र्याऐवजी सगळेच स्वत:ला मुख्यमंत्री समजतात.  हे सरकार तीन पायाचं असून ते तिन्ही पक्ष वेगवेगळ्या दिशेने जात आहेत, त्याचा त्रास येथील जनता भोगत आहे.

    अनिल देशमुख वसुलीचे टार्गेट प्रकरणात अनेक नावं समोर येतील. आगामी काळात पुराव्यासहित अनेक गोष्टी बाहेर येतील. त्यामध्ये सर्व काही स्पष्ट होईल, असेही फडणवीस म्हणाले

    संजय राऊतांची परिस्थिती सहनही होत नाही, सांगताही येत नाही अशी झाली आहे. त्यामुळे ते मला काही माहिती नाही, मला काही सांगता येणार नाही, अशा प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

  • 05 Apr 2021 03:40 PM (IST)

    जयश्री पाटलांची नेमकी याचिका काय? ज्यामुळे अनिल देशमुखांना घरी जावं लागलं

    जयश्री पाटलांची नेमकी याचिका काय? ज्यामुळे अनिल देशमुखांना घरी जावं लागलं

  • 05 Apr 2021 03:39 PM (IST)

    Anil Deshmukh Resignation : अनिल देशमुखांचा राजीनामा, गृहमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार?

    Anil Deshmukh Resignation : अनिल देशमुखांचा राजीनामा, गृहमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार?

  • 05 Apr 2021 03:38 PM (IST)

    Anil Deshmukh resign: अनिल देशमुख यांचं राजीनामा पत्र जसंच्या तसं

    Anil Deshmukh resign: अनिल देशमुख यांचं राजीनामा पत्र जसंच्या तसं

  • 05 Apr 2021 03:38 PM (IST)

    अखेर अनिल देशमुख यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांना भेटून राजीनामा

    अखेर अनिल देशमुख यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांना भेटून राजीनामा

  • 05 Apr 2021 03:37 PM (IST)

    गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा, परमबीर सिंग प्रकरणात कोर्टाच्या निकालानंतर निर्णय

    गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा, परमबीर सिंग प्रकरणात कोर्टाच्या निकालानंतर निर्णय

Published On - Apr 05,2021 5:52 PM

Follow us
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.