Maharashtra MLC Election : गणपत गायकवाड यांना एक न्याय आणि देशमुख, मलिक यांना वेगळा न्याय कसा?; विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले

Maharashtra MLC Election Voting begins : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान सुरु आहे. क्रॉस वोटिंगची भीती सर्वच पक्षांना सतावत आहे. त्यातच भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तुरुंगबाहेर आणण्यात येत असल्याने राजकारण तापले आहे.

Maharashtra MLC Election : गणपत गायकवाड यांना एक न्याय आणि देशमुख, मलिक यांना वेगळा न्याय कसा?; विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले
गणपत गायकवाड यांच्या मतदानावरुन राजकारण तापले
Follow us
| Updated on: Jul 12, 2024 | 11:45 AM

युद्धात आणि प्रेमातच नाही तर राजकारणात पण सर्व काही माफ असते, याचा प्रत्यय या विधान परिषद निवडणुकीतून आला आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान सुरु झाले आहे. 12 उमेदवार रिंगणात आहे. सर्वच पक्षांना क्रॉस वोटिंगची भीती सतावत आहेत. त्यातच भाजपने एक नामी शस्त्र बाहेर काढले आहे. उल्हानगर पोलीस ठाण्यात गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड यांना या निवडणुकीसाठी तुरुंगाबाहेर येत आहेत. त्यावरुन राजकारण तापले आहे. त्यांनी भाजपसह महायुतीवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या या खेळीवर चांगलेच तोंडसूख घेतले आहे.

हा तर सत्तेचा दुरुपयोग

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकाराला तीव्र विरोध केला. हा सत्तेचा दुरुपयोग आहे. न्याय व्यवस्थेवर आपण बोलू शकत नाही. गणपत गायकवाड यांनी स्वतः गोळी झाडली हे सगळ्यांनी पाहिलं. निवडणूक आयोग बायस आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.निवडणूक आयोग त्यांच्या घराचा गडी आहे, असं झाले हे तर. सत्तेचा वापर केला जात आहे. उघड्या डोळ्याने हे सगळे पाहत आहेत. निवडणूक अधिकाऱ्याला आम्ही आक्षेप नोंदवला असल्याचे दानवे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

न्याय वेगळा कसा?

माझ्यावर खोटे आरोप करून जेल मध्ये टाकले होते. त्यावेळी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाची परवानगी मागितली पण मला मिळाली नाही. आश्चर्याची गोष्ट आहे गणपत गायकवाड यांच्या साठी वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय असं चित्र आहे. भाजपचा लोअर कोर्टवर दबाव असल्याचा गंभीर आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.

महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार जिंकणार

महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार जिंकणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. विधान परिषद निवडणुकीमध्ये प्रत्येकाने जादा उमेदवार लादलेला आहे. भाजपला सुद्धा त्यांचे सर्व उमेदवार निवडून आणण्यात इतकी मत नाही. अजित पवार गट,शिंदे गटाची सुद्धा मतं नाही. महाविकास आघाडीने तीन उमेदवार उभे केले, काँग्रेसकडे त्यांचा उमेदवार निवडून आणण्यात इतकी मत नक्कीच आहेत. पण शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हे उमेदवार आहेत.

महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि लोकसभेचे निकाल पाहता अनेक आमदार हे महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेले आहेत. 23 मतांचा कोठा आहे, मला पूर्ण खात्री आहे सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील त्याविषयी आमच्या मनात शंका नाही. स्वतः उद्धव ठाकरे,शरद पवार, जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी त्यासाठी यशस्वीपणे प्रयत्न करत आहेत, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.