धाराशिवमध्ये पुन्हा धाकधूक वाढली, ईव्हीएमची लागणार कसोटी; शरद पवार गटाची जय्यत तयारी, 18 मशीनवर फेर मोजणीसाठी इतकी रक्कम मोजली

Paranda Constituency Vote Re Counting : 76 लाख मतं आली कुठून हा प्रश्न काँग्रेसने मैदानात उतरवला आहे. निवडणूक आयोगाने त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. अनेक गावातील मतदानात तफावत असल्याचा आरोप होत असतानाच शरद पवार गटाने परांडा विधानसभा मतदारसंघात ईव्हीएमविरोधात थेट पाऊल टाकलं आहे.

धाराशिवमध्ये पुन्हा धाकधूक वाढली, ईव्हीएमची लागणार कसोटी; शरद पवार गटाची जय्यत तयारी, 18 मशीनवर फेर मोजणीसाठी इतकी रक्कम मोजली
परंडा मतदारसंघात फेर मतमोजणी
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 11:09 AM

‘ईव्हीएम’ विरोधात महाविकास आघाडी मैदानात उतरली आहे. 76 लाख मतं आली कुठून या प्रश्नासह काँग्रेस मैदानात उतरली आहे. तिकडे मनसेने सुद्धा या मुद्दावरून नाराजीचा सूर आळवला आहे. राज्यातील काही गावात, मतदान केंद्रावर मतदानात तफावत असल्याचा, मतदार आणि मतदानाची संख्या जुळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याविरोधात अर्जफाटे करण्यासोबतच सर्वोच्च न्यायालयात न्याय मागण्याचा मार्ग चाचपण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता शरद पवार गटाने थेट मैदानातच उडी घेतली आहे. धाराशिवमध्ये फेर मतमोजणीसाठी शरद पवार गटाने मोठी रक्कम भरली आहे. ईव्हीएम या मतमोजणीच्या परीक्षेत पास होते की नापास हे लवकरच समोर येणार आहे.

ईव्हीएमवर काय आरोप?

राज्यात महायुतीची लाट आली आहे. भरभरून मतदान झाले आहे. भाजपाला तर खोऱ्यानं मतं मिळाली आहे. त्यामागे मोठं धोरण आहे. पण विरोधकांना ते पचनी पडत नसल्याचे दिसते. काही मतदार केंद्रावर मतदार कमी आणि मतदान अधिक असा प्रकार समोर आल्याचा दावा विरोधक करत आहेत. तर काही ठिकाणी ऑडियो क्लिपमधून ईव्हीएम हॅकिंग करण्यात आल्याचे समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. मतदान आणि मतदारांची आंधळी कोशिंबीर खेळण्यात आली आणि त्यातून महायुतीला भरभरून मतं मिळाल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

हे सुद्धा वाचा

परांडा मतदारसंघात होणार फेर मतमोजणी

धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघात फेर मतमोजणीची मागणी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे यांनी केली आहे. त्यांचा या मतदारसंघात निसटता पराभव झाला. त्यामुळे त्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे. त्यासाठी 8.5 लाख रुपये त्यांनी निवडणूक विभागाकडे जमा केली आहेत. 18 मशीनची पुन्हा फेर मोजणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे राहुल मोटे यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. अपेक्षित मतदान न मिळालेल्या यंत्रावरील मतांची फेरमोजणी करण्याची मोटे यांनी मागणी केली आहे.

अटीतटीच्या सामन्यात झाला पराभव

परंडा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांच्यामध्ये अटीतटीचा सामना झाला होता. या मतदारसंघात तानाजी सावंत यांनी 1509 मताने निसटता विजय मिळवला. तानाजी सावंत यांना 1 लाख तीन हजार 254 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोटे यांना 1 लाख 1 हजार 745 एवढे मतदान झाले. त्यानंतर मोटे यांनी फेत मतमोजणीसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. फेर मतमोजणी झाल्यानंतर काय चित्र राहणार याकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे.

राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले
राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले.
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?.
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?.
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी.
'तिघांना शुभेच्छा पण आता नाटकबाजी बंद..', शपथविधी होताच जरांगे पेटले
'तिघांना शुभेच्छा पण आता नाटकबाजी बंद..', शपथविधी होताच जरांगे पेटले.
'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले
'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले.
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ.
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?.
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?.
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'.