महाराष्ट्र बंदच्या हाकेवर त्याचं फक्त विचारमंथन, शिंदे गटाचा ठाकरेंना टोला

ठाकरे गटाने महाराष्ट्र बंदची हाक दिली असली तरी त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादावर महाराष्ट्र बंद होणार की नाही यावरच ते विचारमंथन करतील असा टोला शिंंदे गटाने लगावला आहे.

महाराष्ट्र बंदच्या हाकेवर त्याचं फक्त विचारमंथन, शिंदे गटाचा ठाकरेंना टोला
Follow us
| Updated on: Nov 25, 2022 | 11:27 PM

मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षासह शिंदे गटातील काही नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. तर भाजपमध्ये गेलेले उदयनराजे यांनी त्यांना हाकलून द्या अशी मागणी केली होती. भगतसिहं कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्याबरोबर केली होती. त्यामुळे वातावरण प्रचंड तापले होते. राज्यपालांची उचलबांगडी करा अशी भूमिका घेत महाविकास आघाडीतील पक्षानी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून खासदार संजय राऊत यांनी आता महाराष्ट्र बंदची हाक देत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आहे.

त्यामुळे याता शिंदे गटाचे प्रतोज भरत गोगावले यांनी ठाकरे गटाला आणि खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्र बंदविषयी महाविकास आघाडीतील पक्षांचे विचारमंथन चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

भरत गोगावले म्हणाले की, महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळतो की नाही ते आधी ठाकरे गट बघणार नंतर महाराष्ट्रची हाक देतील असाही त्यांनी टोला लगावला आहे. यावेळी महाराष्ट्र बंद होणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल शिंदे गटाचे आणि भाजपचे काय मत, यावर उत्तर देताना ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमची भूमिका स्पष्ट केलीच आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता असल्याचे सांगत त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर मात्र स्पष्ट मत व्यक्त केले नाही.

महाराष्ट्र बंदविषयी ठाकरे गट फक्त विचारमंथन करत राहणार. त्यामुळे महाराष्ट्र बंद वगैरे काही होणार नाही असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लागवला आहे.

त्यामुळे भरत गोगवले यांनी महाराष्ट्र बंद होणार नाही असं सांगितले असले तरी खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र महाराष्ट्र बंदची हाक देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.