AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीला कोणती खाती मिळणार? यादी फुटली?; ‘ते’ खातं मिळवण्यात अजितदादा यशस्वी?

देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप लवकरच होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ आणि नियोजनसह काही जुनी खाती आणि राज्य उत्पादन शुल्क हे नवीन खातं मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार अर्थ खातं सांभाळतील, तर शिवसेनेला जुनीच खाती मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाची खाती कुणाला मिळतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीला कोणती खाती मिळणार? यादी फुटली?; 'ते' खातं मिळवण्यात अजितदादा यशस्वी?
अजित पवार
| Edited By: | Updated on: Dec 18, 2024 | 5:40 PM
Share

देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप आज किंवा उद्या होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मंत्रीही आपल्याला कोणतं खातं मिळणार याकडे लक्ष लागलं आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही आपल्याला कोणती खाती मिळणार याची उत्सुकता लागली आहे. शिवसेनेने गृहखात्यासाठी बराच आटापिटा केला. पण त्यांच्या पदरी निराशा आली. तर अजितदादा यांच्या राष्ट्रवादीकडचं अर्थ खातं फडणवीस स्वत:कडे ठेवणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे अजितदादांकडे अर्थ खातं राहणार की नाही असं बोललं जात होतं. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थ खातं अजितदादांकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे जुनीच खाती येणार आहेत. त्यांना एकच नवं खातं दिलं जाणार आहे. मात्र खात्यात अदलाबदलीही होणार नसल्याचं सांगण्यात आलं. अर्थ आणि नियोजन, महिला आणि बालकल्याण, कृषी, सहकार, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि बंदरे, मदत पुनर्वसन, अन्न नगरी पुरवठा आणि अन्न औषध प्रशासन ही खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यात राज्य उत्पादन शुल्क हे खाते नव्याने राष्ट्रवादीला मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे नव्या सरकारच्या खाते वाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कुणाला कोणतं खातं मिळणार?

राष्ट्रवादीत मकरंद पाटील यांना सहकार खातं मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. अजितदादा स्वत:कडे अर्थ आणि नियोजन खातं ठेवणार आहेत. तर आदिती तटकरे यांना महिला आणि बालकल्याण खात्याची जबाबदारी दिली जाणार आहे. दत्ता मामा भरणे यांच्याकडे कृषी, तर धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपद दिलं जाणार आहे. तसेच हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शिवाय राष्ट्रवादीला राज्य उत्पादन शुल्कही दिलं जाणार आहे. अजित पवार हे खातं स्वत:कडे ठेवणार असल्याचं सांगितलं जात आहे.

शिवसेनेला जुनीच खाती?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जुनीच खाती दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं असणार आहे. त्यासोबत त्यांच्याकडे आणखी कोणतं खातं असणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवाय गृह खातं कुणाकडे जाणार हे सुद्धा अजून गुलदस्त्यात असल्याने त्याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.