AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुती लोकसभेच्या किती जागा जिंकणार?; मुख्यमंत्री शिंदे यांनी पहिल्यांदाच सांगितला आकडा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांना रोज सकाळी टीका करण्याशिवाय दुसरा काहीच कामधंदा उरला नसल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांची तब्येत बरी आहे, असं सांगतानाच मराठा समाजाला आम्ही टिकणारं आरक्षण देणार आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

महायुती लोकसभेच्या किती जागा जिंकणार?; मुख्यमंत्री शिंदे यांनी पहिल्यांदाच सांगितला आकडा
cm eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 04, 2023 | 6:15 PM
Share

मुंबई | 4 नोव्हेंबर 2023 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी बैठका, मेळावे आणि संवादावर भर देण्यास सुरुवात केली आहे. काही राजकीय पक्षांनी आंदोलने करून मतदारांचे लक्ष वेधण्याचं काम सुरू आहे. तसेच निवडणुकीच्या मुद्द्यावरून एकमेकांवर आरोपप्रत्यारोपही केले जात आहेत. तसेच किती जागा जिंकणार याचा दावाही केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लोकसभा निवडणुकीत महायुतीला किती जागा मिळतील याचा आकडाच सांगितला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच हा आकडा सांगितला आहे.

काल आमची महायुतीची बैठक झाली. त्यात समन्वय समिती ठरली. तिन्ही पक्षात समन्वय साधण्यावर चर्चा झाली. जिल्हा, तालुकास्तरावर महायुतीचे सर्व कार्यकर्ते एक दिलाने काम करतील, असं या बैठकीत ठरलं. लोकसभेच्या निवडणुकीत राज्याने केलेलं काम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीतील 8 वर्षाच्या कामाचं मोजमाप लोकं करतील. मतदार विरोधकांना प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. राज्यात आमच्या 45 जागा निवडून आल्याशिवाय राहणार नाही, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

आम्ही काम करतोय

यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. आम्ही काम करतो. विरोधकांना काही कामधंदा राहिला का? रोज आरोप करणं हेच विरोधकांचं काम आहे. आम्ही कामातून उत्तर देत आहोत. काम करत आहोत. त्यांनी बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू करतोय. इगो ठेवून त्यांनी कामं बंद पाडलेली. असे राज्यकर्ते नसतात. अंहकारी वृत्तीने राज्य चालत नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्ही आमचं का करतो. त्यांना रोज सकाळी उठल्यावर तेवढंच काम आहे. आम्ही सकाळी उठून काम करतोय. प्रकल्प पुढे नेत आहोत. तुम्ही हे सर्व पाहात आहात, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

मला निमंत्रण आलंय

जम्मू-काश्मीरमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत. या कार्यक्रमाची माहितीही त्यांनी दिली. मला निमंत्रण दिलं आहे. भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डवर जम्मूत हा पुतळा उभारला जात आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे आपल्या जवानांना प्रेरणा मिळेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टिकणारं आरक्षण देणार

जरांगे पाटील यांना मी काल धन्यवाद दिले आहेत. मराठा समाजालाही धन्यवाद दिले आहेत. सरकारच्या विनंतीवर जरांगे यांनी विश्वास ठेवला आहे. आम्ही मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणार आहोत. इतरांवर अन्याय न करता आरक्षण देऊ, असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळात झालेल्या तारखेच्या घोळावर भाष्य करणं टाळलं.

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.