AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Morcha : आम्ही मराठ्याची औलाद…आता सुट्टी नाही, शनिवार-रविवारी कोणते वादळ येणार? सोमवारचा मोठा इशारा

Manoj Jarange Mumbai Morcha : आम्ही मराठ्याची औलाद असा इशारा देत मराठे मुंबईत येणार आणि त्यांना कोणी अडवू शकत नाही असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. त्यातच शनिवार-रविवारी कोणते वादळ येणार?

Manoj Jarange Morcha : आम्ही मराठ्याची औलाद...आता सुट्टी नाही, शनिवार-रविवारी कोणते वादळ येणार? सोमवारचा मोठा इशारा
मनोज जरांगे पाटील
| Updated on: Sep 02, 2025 | 10:48 AM
Share

आम्ही मराठ्याची औलाद आहोत. सरकारने कितीही भीती दाखवली तरी मी आझाद मैदानावरून उठणार नाही. आता सुट्टी नाही. सरकार आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याला यश येणार नाही. आम्ही आरक्षणाशिवाय हटणार नाही असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. तर सरकारने वेळीच निर्णय घेतला नाही तर शनिवार-रविवारी राज्यातील मराठे मुंबईत दाखल व्हायला सुरुवात होईल आणि मग सरकारला मोठी अडचण होईल असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारशी बोलायला तयार

तुम्ही ज्यांच्या भरवशावर बोलता, त्यांच्या पेक्षा आमची संख्या साडे नऊ पट जास्त आहे. आझाद मैदानावर मेलो तरी चालेल, पण हटणार नाही.देवेंद्र फडणवीस यांना ठासून सांगतो आरक्षण घेतल्याशिवाय मुबंई सोडत नाही. न्यायदेवता आपल्यावर अन्याय करत नाही.तुम्ही सांगितले तर रस्त्यावरच्या गाड्या काढल्या, मैदानावर पाच हजार लोक ठेवले आहेत. सरकारला नासकी सवय लागली आहे. फडवणीस यांनी आमच्यासोबत अन्यायकारक वागत आहे.देवेंद्र फडणवीस न्यायालयाला खोटी माहिती देतात.आमची सरकार सोबत चर्चेला तयार, पण हैदराबाद आणि सातारा संस्थान गॅझेट मला पाहिजे, असे जरांगे पाटील म्हणाले.

चर्चेला या आम्ही सन्मान करू

30, 35 मंत्री या नाही तर दोघे या. त्यांचा आम्ही सन्मान करू. हैदराबाद आणि सातारा गॅझेटला तुमची काय हरकत आहे.पूर्वजांची शिकवण आहे, घास घास खाल्ले पाहिजे.समाजाला पिढ्यापार पुरेल असे देतो. कबड्डी खेळायच्या आधी खो द्यायच्या नसतो. वेशीवर मराठे अडवले तरी ते शनिवार रविवार मुंबई मध्ये येतील, असा इशारा त्यांनी दिला. येत्या सोमवारी मुंबईकर कोण आणि मराठा कोण हे फडणवीस यांना कळणार नाही. मराठे हे हुशार आहे. ते कोणत्या मार्गाने मुंबईत शिरणार हे तुम्हाला कळणार पण नाही असा इशारा त्यांनी दिला. सोमवारी मराठा आंदोलकांची संख्या कित्येक पटीने अधिक असेल हे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आंदोलन लवकर योग्य रितीने हातळले नाही तर मुंबईची तुंबई होण्याची शक्यता त्यांच्या वक्तव्यावरून समोर येत आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.