AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उडवली उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीची खिल्ली, असा व्हिडीओ केला तयार

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसात अनेक उलथापालथी पाहायला मिळाल्या आहेत. त्यात अधिवेशन सुरु असल्याने राजकीय घडामोडींना वेग मिळाला आहे. अस असताना उद्धव ठाकरे यांची मुलाखत चर्चेचा विषय ठरली आहे. आता मनसेनं मुलाखतीचं विडंबन केलं आहे.

Video : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उडवली उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीची खिल्ली, असा व्हिडीओ केला तयार
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचं विडंबन, तयार केला असा Video
| Updated on: Jul 26, 2023 | 8:01 PM
Share

मुंबई : शिवसेनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताबा मिळवल्यानंतर उद्धव ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि इतर नेते शिवसेनेच्या आमदारांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. या पार्श्वभूमीवर उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत राज्याच्या राजकारणात चर्चेत आली आहे. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना सत्ताधारी भाजपा शिवसेना पक्षावर टीकास्त्र सोडलं. या मुलाखतीची चर्चा होत असताना आता मनसे नेते संदीप देशपांडे मुलाखत प्रदर्शित केली आहे.

मुलाखतीतून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विडंबन करत खिल्ली उडवली आहे. संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने मुलाखत घेतली तशीत मुलाखत संदीप देशपांडे यांची घेतली गेली. कुणाचा आवाज असं टीझर सुरुवातीला देण्यात आलं आहे. ‘एक ज्वलंत आणि स्फोटक मुलाखत’ हे वाक्य विचित्र आवाजात रेकॉर्ड केलं असून त्यावर ‘कुणाचा आवाज’ असा टेक्स्ट लिहिला आहे.

काय आहे विडंबन केलेल्या मुलाखतीत?

मुलाखतकार : आज मी आणि फक्त मीच…त्यांची नेहमीच घेतो मुलाखत..ते महाराष्ट्राचे नव्हे, जगाचे एक नंबरचे माजी मुख्यमंत्री..त्यांची ओळख करून देण्याची गरजच नाही. कोरोनाच्या काळामध्ये घरात बसून सरकार चालवलं. फेसबुकच्या माध्यमातून ते तुमच्या घराचे कुटुंब सदस्य झाले. कोरोनासोबत आमची जायची तयारी आहे. कोरोनाची आमच्यासोबत राहण्याची तयारी आहे का? हे जे वाक्य ज्यांनी अजरामर केलं तेच..महानगरपालिकेचे करोडो रुपये खर्च केले..हजारो कोटी खर्च केले, खड्डे बुजवले नाहीत. रस्ते चांगले बनवले नाहीत. त्याच साहेबांची आज स्फोटक आणि ज्वलंत मुलाखत सुरु करुयात. काय सांगाल?

संदीप देशपांडे : संजय…माफ करा..संतोष..मला घरी बसायला आवडतं. किंबहुना खुपच आवडतं. वडिलांना दिलेला शब्द..शिवसेनेचा मुख्यमंत्री..मर्दाची अवलाद..मर्द..दिल्लीश्वर..अफझल खानाच्या फौजा..कोरोना..मास्क..सुरक्षित अंतर..कोमट पाणी..कपटी..मशाल..आणि मी संकटात असलो की मराठी माणुस..थोडं थोडं हिंदुत्व..औरंगजेब.मिंधे गट..गद्दार..खंजीर..खोके..मुलाखत संपली..किंबहुना संपलीच..

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या विडंबनात्मक मुलाखतीनंतर ठाकरे गटाचे आमदार आक्रमक झाले आहेत. भास्कर जाधव यांनी जोरदार टीका करत खडे बोल सुनावले आहेत.

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.