AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“नायर रुग्णालयाची वाटचाल कोलकाताच्या दिशेने…”, लैंगिक छळाच्या तक्रारींवरून मनसे आक्रमक, म्हणाले “नंतर एन्काऊंटर करण्यापेक्षा…”

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणी उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याची नेमणूक करून चौकशी करावी अशी मागणी केली होती.

नायर रुग्णालयाची वाटचाल कोलकाताच्या दिशेने..., लैंगिक छळाच्या तक्रारींवरून मनसे आक्रमक, म्हणाले नंतर एन्काऊंटर करण्यापेक्षा...
| Updated on: Oct 01, 2024 | 2:31 PM
Share

Sandeep Deshpande On Nair Hospital Molestation case : मुंबई महापालिकेच्या नायर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा लैंगिक छळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित सहयोगी प्राध्यापकाला पालिका प्रशासनाने निलंबित केलं होतं. यानंतर आता मनसेने याप्रकरणी आवाज उठवला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणी उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याची नेमणूक करून चौकशी करावी अशी मागणी केली होती.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी नायर रुग्णालयात विद्यार्थिनीच्या लैँगिक छळाबद्दल भाष्य केले होते. “काल नायर वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना भेटलो. सगळेजण प्रचंड दहशतीखाली आहेत. नायरची वाटचाल कोलकात्ताच्या दिशेने होत आहे. महापालिका प्रशासनाने हे संवेदनशीलपणे हाताळले पाहिजे. नंतर कपाळाला हात लावून उपयोग नाही” असं संदीप देशपांडे म्हणाले होते.

त्यासोबतच त्यांनी आता पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी याप्रकरणी सविस्तर भाष्य केले. काल नायरमधील काही विद्यार्थी आम्हाला भेटले. त्यांनी आम्हाला कशाप्रकारे महाविद्यालयात त्यांचा लैंगिक छळ होतो, याबद्दल सांगितले. तसेच वारंवार तक्रार करुनही या तक्रारीवर कारवाई होत नाही. याप्रकरणी पॉश कमिटीने केलेल्या चौकशीत एकजण दोषी आढळला. त्याला नायर परिसरातून बाहेर काढण्याऐवजी त्याच परिसरात क्वार्टर देण्यात आली. मानवतावादी दृष्टिकोन ठेवून ही क्वार्टर देण्यात आल्याच पत्रक काढण्यात आले, असे विद्यार्थ्यांनी संदीप देशपांडेंना सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी काळजी घ्यावी

आमची तक्रार केल्यास अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जातात. पोलीस स्टेशनला मुलगी तक्रार करायला गेल्यावरही एक महिला पोलिसांकडून स्टेटमेंट घेण्याऐवजी पुरुष पोलीस अधिकारी तिथे उभा करण्यात आला. आरोपीचा नंतर एन्काऊंटर करण्याऐवजी या घटना घडताना थांबवणे गरजेचे आहे. त्याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, असे संदीप देशपांडे म्हणाले.

याप्रकरणी एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात यावी, अशी आमची पोलीस आयुक्तांकडे मागणी आहे. मनसे या विद्यार्थ्यांच्या मागे आहे. राजसाहेब मागे उभे आहेत. तक्रार देण्यास विद्यार्थ्यानी समोर यावे. ज्यावेळी आमच्याकडे अधिकृत तक्रार येईल, तेव्हा आम्ही प्रशासन काय कारवाई करतंय, याची वाट पाहणार नाही. आम्ही मनसे स्टाईल भूमिका यात घेऊ, असा इशाराही संदीप देशपांडे यांनी दिला.

“आयुक्तांनी याची दखल घ्यावी, नाहीतर आम्हाला…”

“याप्रकरणी आयुक्त दुर्लक्ष करतात ही बाब खरी आहे. आम्ही पुन्हा त्यांना विनंती करतो की त्यांनी कारवाई करावी. आयुक्तांनी याची दखल घ्यावी, नाहीतर आम्हाला आयुक्तांची दखल घ्यावी लागेल. या प्रकरणाकडे संवेदनशील पद्धतीने बघितलं नाही तर आपला काहीही फायदा नाही”, असेही संदीप देशपांडे म्हणाले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.