Mumbai Metro : मुंबई मेट्रोची सलग तिसऱ्या दिवशी रखडपट्टी, तांत्रिक बिघाडामुळं मुंबईकर हैराण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 सुरु करण्यात आली आहे. मात्र, सलग तिसऱ्या दिवशी मुंबई मेट्रोत बिघाड होत असल्याचं दिसून आलं आहे.

Mumbai Metro : मुंबई मेट्रोची सलग तिसऱ्या दिवशी रखडपट्टी, तांत्रिक बिघाडामुळं मुंबईकर हैराण
मुंबई मेट्रो Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 11:57 AM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई मेट्रो (Mumbai Metro) 2 अ आणि मेट्रो 7 सुरु करण्यात आली आहे. मात्र, सलग तिसऱ्या दिवशी मुंबई मेट्रोत बिघाड होत असल्याचं दिसून आलं आहे. मागाठणे, ओवरीपाडा या स्टेशनवर मेट्रो बंद पडली आहे. मागाठणे काल देखील ही मेट्रो बंद पडली होती. ही मेट्रो बंद पडल्यानंतर प्रवाशांना अर्धा तास थांबायला लागलं होतं. त्यानंतर दुसऱ्या ट्रेनमधून पुढं पाठवण्यात आलं आहे. मुंबई मेट्रो बंद पडत असल्यानं मुंबईकर संतप्त झाले आहेत. मुंबईकरांनी मेट्रोत इतक्या अडचणी होत्या तर सुरु करण्याची घाई का करण्यात आली, असा सवाल केला आहे. आगामी काळात मुंबई मेट्रोमधील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, असं मुंबई मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांनी म्हटलं आहे.

मुंबई मेट्रोत वारंवार बिघाड

मुंबई मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन 2 एप्रिलला करण्यात आल्यानंतर मुंबईकरांचा प्रवासाचा त्रास कमी होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र, पहिल्या दोन दिवसांमध्ये मेट्रोच्या गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याचं दिसून आलं होतं. आज देखील मुंबई मेट्रोमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळं मुंबईकरांनी संताप व्यक्त केला. मागाठणे आणि ओवरीपाडा स्टेशनवर मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाले होते. मागाठणे येथे मेट्रो बंद पडल्यानंतर दुसरी मेट्रो ट्रेन बोलावून दुसऱ्या ट्रेनमधून प्रवाशांना पुढं पाठवण्यात आलं होतं.

प्रवाशांचा संताप

मुंबई मेट्रोमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त आहे. मेट्रोतील तांत्रिक अडचणी  दूर न करता मेट्रो सुरु करण्याची घाई का करण्यात आली, असा सवाल प्रवाशांनी केला आहे. प्रवाशांनी एमएमआरडीएच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. आगामी काळात तरी महामेट्रोकडून हे तांत्रिक बिघाड होऊ नयेत यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी भावना मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांनी व्यक्त केलीय. तर, आज सोमवार असून कामावर जाण्यासाठी मेट्रोतून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची मोठी अडचण मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं झाली होती.  नंतर, पर्यायी ट्रेनची व्यवस्था करुन त्यांना पुढे पाठवण्यात आलं.

इतर बातम्या: 

Gulabrao Patil on Raj Thackeray: राज ठाकरे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते, गुलाबराव पाटील यांची घणाघाती टीका

Sujay Vikhe VIDEO: तर आम्ही एका मिनिटात पलटी मारतो, सुजय विखेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, मोदींच्याच रॅलीचं उदाहरण

Sanjay Raut : तर मोदींविरोधात पर्याय निर्माण होऊ शकत नाही, शरद पवारांच्या ‘यूपीए’ भूमिकेवर राऊतांचं मोठं वक्तव्य

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.