AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजराती- मराठी वाद, गुजराती सोसायटीत मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास विरोध, ठाकरे गट आक्रमक

mumbai north east lok sabha constituency Sanjay Patil: घाटकोपरमध्ये शिवसैनिकांना प्रचार न करु दिल्याबद्दल शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले. त्यांनी बुळचट शिवसेना आणि फडणवीस गट गांडू असल्याचे म्हटले आहे.

गुजराती- मराठी वाद, गुजराती सोसायटीत मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास विरोध, ठाकरे गट आक्रमक
संजय दिना पाटील यांच्या प्रचारास गुजराती सोसायटीत विरोध केल्याचा आरोप.
| Updated on: May 06, 2024 | 12:31 PM
Share

मुंबई आणि उपनगरात लोकसभा निवडणुकीसाठी 20 मे रोजी मतदान होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने सर्व सहा जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. उमेदवारांचा प्रचार जोरात सुरु झाला आहे. या दरम्यान मुंबईत मराठी-गुजराती वाद समोर आला आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय दिना पाटील उमेदवार आहे. त्यांच्या प्रचारासाठी घाटकोपरमध्ये उबाठामधील शिवसैनिक गेले होते. गुजराती सोसायटीत त्यांच्या प्रचारास विरोध करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केले आहे. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला आहे.

काय झाला प्रकार

शिवसेना ‘उबाठा’चे शिवसैनिक संजय दिना पाटील यांचा प्रचारासाठी घाटकोपरमध्ये गेले. त्यावेळी मराठी पत्रके वाटण्यास त्यांना विरोध करण्यात आला. मराठी माणसांना बिल्डींगमध्ये प्रचार करु देणार नाही, असे सांगण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. सोसायटीत आम्ही परवानगी घेऊन प्रचार करत आहोत, असे त्यांनी सांगितले, त्यानंतर वाद सुरु होता. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला.

संजय राऊत आक्रमक

घाटकोपरमध्ये शिवसैनिकांना प्रचार न करु दिल्याबद्दल शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले. त्यांनी बुळचट शिवसेना आणि फडणवीस गट गांडू असल्याचे म्हटले आहे. बुळचट शिवसेना आणि फडणवीस हे या विषयावर गप्पा का? हिम्मत असेल तर त्यांनी आवाज द्या नाहीतर आम्ही बघतो काय करायचं आहे ते, असा जोरदार हल्ला संजय राऊत यांनी केला.

संजय दिना विरोधात मिहीर कोटेचा

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना उबाठाकडून संजय दिना पाटील उमेदवार आहेत. महायुतीकडून मिहीर कोटेचा उमेदवार आहेत. ठाकरे गटाने उमेदवारी दिलेले संजय पाटील हे आधी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना फुटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. ते २००९ मध्ये ईशान्य मुंबईतून खासदार झाले होते.

संजय पाटील नावाचे डमी उमेदवारही

ईशान्य मुंबईत संजय पाटील नावाचे चार डमी उमेदवार उभे केले होते. त्यापैकी दोघांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले. याबाबत संजय दिना पाटील यांनी महायुतीवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, खूप मेहनत करुन त्यांनी संजय पाटील नावाचे उमेदवार शोधून आणले. मात्र त्यांचा हा डाव उलटला आहे. सांगलीचे संजय महादेव पाटील आणि नवी मुंबई घनसोलीचे संजय पांडुरंग पाटील यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले. नवी मुंबईतील संजय निवृत्ती पाटील आणि मुंबई शिवाजी नगरमधील संजय बंडू पाटील यांचे अर्ज स्वीकारले असेल तरी जनतेला सर्व माहीत आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.