AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठवाड्यातील ‘ती’ जागा ओरिजनल शिवसेनाच जिंकणार; संजय राऊतांना ठाम विश्वास

Sanjay Raut on Chhatrapati Sambhajinagar Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीवर संजय राऊतांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले? मराठवाड्यातील त्या एका जागेवर संजय राऊतांनी दावा सांगितला आहे. संजय राऊत आजच्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले? वाचा सविस्तर...

मराठवाड्यातील 'ती' जागा ओरिजनल शिवसेनाच जिंकणार; संजय राऊतांना ठाम विश्वास
| Updated on: Mar 06, 2024 | 2:00 PM
Share

गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 06 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कालच्या सभेत छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर अप्रत्यक्षपणे दावा सांगितला आहे. याबाबत विचारलं असता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट भाष्य केलंय. छत्रपती संभाजीनगरची जागा आम्ही लढत आहोत. खरी शिवसेना ही जागा लढणार आहे. आम्ही जिंकणारे अमित शहा यांनी जी गॅंग निर्माण केली आहे. त्यांच्याकडून ती जागा काढून घेतली आहे. त्याच्याशी आमचा संबंध नाही त्यांना लाज वाटली पाहिजे. छत्रपती संभाजीनगरची जागा आम्ही लढणार आणि जिंकणार देखील, असं संजय राऊत म्हणाले.

कोल्हापूरच्या जागेवरही दावा

कोल्हापूरचा मतदार हा शिवसेनेचाच मतदार होता. मतदार हा कोणाचाच नसतो… सांगलीमध्ये 2014 साली काँग्रेसचा साडेतीन लाख मतांनी पराभव झालेला आहे. त्यानंतर त्या ठिकाणी काँग्रेसचा मतदार नव्हता. 2019 ला सांगलीमध्ये काँग्रेसचा उमेदवार नव्हता. तो मतदार संघ आता काँग्रेसचा राहिलेला नाही. गेली तीस वर्षे सातत्याने कोल्हापूर मतदारसंघ लढत आहे. सध्या सीटिंग जागा आमची आहे. रमेश देव कोल्हापूरला आमच्या तिकिटावर लढलेले आहेत, असं म्हणत कोल्हापूरच्या लोकसभा जागेवरही संजय राऊतांनी दावा सांगितला आहे.

केसरकरांवर पलटवार

दीपक केसरकरांनी केलेल्या आरोपांनाही राऊतांनी उत्तर दिलं. पीएमओ ऑफिसला खुलासा करायला सांगा… आम्ही का भेटावं? आम्ही कोणाला भेटणार नाही. दीपक केसरकर ही ताकद आहे का? त्याच्या दंडावर बेडक्या नाहीत. हा मोती तलावावरचा डोमकावळा आहे. हिंमत असेल तरसावंतवाडी निवडून या, असं आव्हान संजय राऊतांनी दिलं आहे.

अमित शाह यांना सवाल

तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अमित शाह महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा मनोरंजन करतात. कधी मोदी येतात, कधी अमित शाह येतात. 370 कलम आपण काढलं आणि त्याला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. आम्ही त्यांच्यासोबत नव्हतो तरी आम्ही पाठिंबा दिला होता. अमित शाहांनी आपली स्मरणशक्ती व्यवस्थित करून घेतली पाहिजे. 370 कलम हटवून कश्मीरमध्ये काय दिवे लावले? कश्मीरचं नाव घ्यायची तुमची लायकी नाही. सर्जिकल स्ट्राइक बाबत आपण लोकांशी खोटं बोललात. आजही शंका निर्माण होत आहे. लाज तुम्हाला वाटली पाहिजे. काश्मीरचा तरुण आजही बेरोजगार आहे, लाज तुम्हाला वाटली पाहिजे.2014 ला आपली घोषणा होती पाकव्याप्त काश्मीर भारतात आणू काय झालं? त्याची लाज तुम्हाला वाटली पाहिजे, असा घणाघात राऊतांनी केला.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.