AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मशाल’ हाती दे…; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचं नवं गीत

Shivsena Thackeray Group Mashal Geet : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचं नवं गीत लॉन्च झालं आहे. 'मशाल' हाती घे... असे या गाण्याचे बोल आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हे गाणं लॉन्च झालं आहे. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे काय म्हणाले? वाचा सविस्तर...

'मशाल' हाती दे...; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचं नवं गीत
उद्धव ठाकरे, शिवनसेना ठाकरे गट पक्षप्रमुखImage Credit source: Facebook
| Updated on: Oct 03, 2024 | 1:30 PM
Share

राज्यात विधानसभा निवडणुकीची राणधुमाळी सुरु झाली आहे. अवघ्या काही दिवसात निवडणुकीची घोषणा होईल. त्याआधी शिवसेना ठाकरे गटाने नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘मशाल’ हाती दे’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं ऑडिओ स्वरूपात आहे. प्रसिद्ध गायक नंदेश यांनी ‘मशाल’ हाती दे’ हे गाणं गायलं आहे. आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. देवीला साकडं घालणारं हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या गोंधळ गीताचं अनावरण झालं. उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. तसंच हे गीत लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना राज्यभरातील शिवसैनिकांना केल्या.

मशाल हाती घे गाण्याचे बोल

दार उघड बये दार उघड

सत्वरी भुवरी ये गं अंबे

सत्वरी भुवरी ये…

आदिमाये तू ये, आदिशक्ती ये

आसूरांचा संहार करण्यासाठी

मशाल हाती दे

सत्वरी भूवरी ये गं अंबे…

उधे उधे उधे….

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

आजपासून नवरात्री सुरू होत आहे. मी आपल्या माध्यमांच्या माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. परंपरे प्रमाणे आपण दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार आहोतच. आज नवरात्र सुरू होत आहे. जगदंबेचा उत्सव आहे. महिषासूर मर्दिनी, असूरांचा वध करून, जे आसूर माजले होते, त्याचा वध करणाऱ्या मातेचा दिवस आहे आजची राजकीय पत्रकार परिषद नाही. राज्यात जे अराजक माजलं आहे. त्यावर एक गाणं आलं आहे. राज्यात तोतयेगिरी सुरू आहे. असंच अराजक शिवाजी महाराजांच्यावेळी राज्यावर आलं होतं. तेव्हा एकनाथांनी बये दार उघड आरोळी मारली होती. या तोतयेगिरीचा नायनाट करण्यासाठी आपण गाणं तयार केलं आहे. देवी आणि जनतेच्या चरणी सादर करत आहोत. गाणं ऑडिओ आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

नंदेश उमप यांनी हे गाणं गायलं आहे. त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतरचं त्यांचं पहिलं गाणं आहे. त्यांचा पहाडी आवाज तसाच आहे. श्रीरंग गोडबोले आणि नंदेश उमप यांनी या गाण्यात जान ओतली आहे. संगीतकार आज कामामुळे आले नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी या गाण्याच्या लॉन्चिंग सोहळ्यात सांगितलं.

कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.