मुंबईतील वडाळ्यात 12 जणांना कोरोना, फक्त एकावर रुग्णालयात उपचार, 11 जण घरीच

वडाळा परिसरातील 12 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यातील फक्त एका रुग्णाला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं (Mumbai Wadala Corona Patient) आहे.

मुंबईतील वडाळ्यात 12 जणांना कोरोना, फक्त एकावर रुग्णालयात उपचार, 11 जण घरीच

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत (Mumbai Wadala Corona Patient) आले. नुकतंच मुंबईच्या वडाळा परिसरातील 12 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यातील फक्त एका रुग्णाला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे. तर बाकी इतर 11 जण हे त्यांच्या घरीच असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे वडाळा परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याचा भीती व्यक्त केली जात आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शनिवारी 25 एप्रिल वडाळा पूर्व भागात (Mumbai Wadala Corona Patient) कोरबा मिठागर या परिसरात मेडिकल कॅम्प आयोजित केले होते. यात 19 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. या सर्वांचे रिपोर्ट 27 एप्रिलला आले. त्यात 19 पैकी 12 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

यानंतर फक्त एका रुग्णाला पालिकेच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नेण्यात आंलं. मात्र इतर 11 हे अद्याप त्यांच्या घरीच आहेत. जवळपास 34 तासांपेक्षा जास्त कालवधी उलटून गेला तरी अद्याप पालिकेतर्फे कोणत्याही हालचाली होत नाहीत. त्यामुळे वडाळा परिसरात कोरोना पसरण्याचा मोठा धोका व्यक्त होत आहे.

वडाळा पूर्व भागात कोरबा मिठागर या परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. या ठिकाणी अनेक कुटुंब 10 बाय 10 च्या रुम मध्ये राहत आहेत. त्यामुळे या ठिकाणी सोशल डिस्टंन्सिंग पाळणे कठीण आहे.

त्यामुळे उर्वरित 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयात कधी घेऊन जाणार, त्यांच्यावर कधी उपचार सुरु होणार? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहे.

मुंबईत कोरोनाचा विळखा वाढताच

देशातील कोरोना संसर्गाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. काल (28 एप्रिल) मुंबईत 393 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 6 हजार 169 वर पोहचली आहे. काल दिवसभरात 25 कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांची संख्या 244 झाली (Mumbai Wadala Corona Patient) आहे.

संबंधित बातम्या : 

मुंबईत आज 393 कोरोना रुग्णांची भर, एकूण आकडा 6 हजार 169 वर

हे पहिल्यांदा घडतंय : कोरोनाविषयी अमेरिका चीनची चौकशी करणार, दोषी आढळल्यास नुकसान भरपाईही घेणार

Published On - 8:56 am, Wed, 29 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI