आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया असल्याचा आरोप, कोण आहे दाढीवाला कासिफ खान?

कासिफ खान हा फॅशन टीव्हीचा एमडी असून त्याशिवाय भारतीय ब्रँड बिझनेस डेव्हलपमेंट व्यवसायातील प्रमुख नाव आहे. कासिफ खानची लेखक आणि स्टार्टअप स्पेशालिस्ट अशी देखील ओळख आहे.

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया असल्याचा आरोप, कोण आहे दाढीवाला कासिफ खान?
कासिफ खान


मुंबई: नवाब मलिक यांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया त्या दिवशी क्रुझवर होता. ड्रग्ज पाटीर्तील रेडचा खेळ संपला असला तरी आंतरराष्ट्रीय खेळाडू बाहेरचं असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केलाय. आंतरराष्ट्रीय माफिया हा समीर वानखेंडेचा मित्र असल्याचा धक्कदायक आरोप मलिक यांनी केला होता. क्रुझवरील पार्टीचं सीसीटीव्ही फुटेज मागवावं त्या फुटेजमध्ये ड्रग्ज माफिया आणि त्याची प्रेमिका क्रूझवर होती, असं एका व्हिडीओत दिसून येत आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. नवाब मलिक यांनी आरोप केलेला तो ड्रग्ज पार्टीतील माफिया हा कासिफ खान असल्याची सूत्रांची माहिती आहे.

कासिफ खान नेमका कोण?

कासिफ खान हा भारतातील फॅशन टीव्हीचा प्रमुख असल्याची समोर आलं आहे. नवाब मलिकांनी आरोप केलेला दाढीवाला व्यक्ती कासिफ खान असून तो क्रुझवर त्याच्या प्रेमिकेसह डान्स करताना दिसून येत आहे. कासिफ खान हे क्रुझवरील पार्टीच्या आयोजकांपैकी एक असल्याचं समोर आलं होतं. कासिफ खान हा फॅशन टीव्हीचा एमडी असून त्याशिवाय भारतीय ब्रँड बिझनेस डेव्हलपमेंट व्यवसायातील प्रमुख नाव आहे. कासिफ खानची लेखक आणि स्टार्टअप स्पेशालिस्ट अशी देखील ओळख आहे.

नवाब मलिक यांचे कासिफ खानवर नेमके आरोप काय?

नवाब मलिक यांनी कॉर्डिलिया क्रुझवर त्या दिवशी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया त्याच्या प्रेमिकेसह होता. त्याच्या प्रेमिकेकडे बंदूक देखील होती, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता. कासिफ खान हा काही दिवस तिहार तुरुंगात असल्याचा दावा देखील नवाब मलिक यांनी केला होता.

इतर बातम्या:

तीन दिवस कोर्टात युक्तिवाद, दावे आणि प्रतिदावे, कोर्टात नेमकं काय घडलं?; वाचा सविस्तर

Nawab Malik : Aryan Khan ला हायकोर्टाकडून अखेर जामीन मंजूर, नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’, आर्यन खानच्या जामीनानंतर नवाब मलिकांचा समीर वानखेडेंना इशारा

Nawab Malik accused beard person present on cruise at the time of party is Kashiff Khan said by sources know details about him

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI