‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’, आर्यन खानच्या जामीनानंतर नवाब मलिकांचा समीर वानखेडेंना इशारा

आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना जोरदार टोला लगावलाय. तुरुंगात टाकणारा आज तुरुंगात जायला घाबरतोय, अशी टीका मलिक यांनी वानखेडेंवर केलीय.

'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त', आर्यन खानच्या जामीनानंतर नवाब मलिकांचा समीर वानखेडेंना इशारा
समीर वानखेडे, नवाब मलिक
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 5:56 PM

मुंबई : क्रूझ ड्रग्स प्रकरणात अखेर 25 दिवसानंतर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मिळाला आहे. तीन दिवस दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. उद्या उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत प्राप्त होईल. त्यानंतर उद्या किंवा शनिवारी हे तिघे कारागृहाबाहेर येतील. दरम्यान, आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना जोरदार टोला लगावलाय. तुरुंगात टाकणारा आज तुरुंगात जायला घाबरतोय, अशी टीका मलिक यांनी वानखेडेंवर केलीय. (Nawab Malik’s warning to Sameer Wankhede after Aryan Khan was granted bail)

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज आर्यन खानसह तीन आरोपींना जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी कालच दोन आरोपींना एनडीपीएस विशेष न्यायालयाने जामीन दिला होता. ज्या प्रकारे फर्जी प्रकरण बनवण्यात आलं, सुरुवातीलाच न्यायालयात त्यांना जामीन मिळाला असता. मात्र प्रत्येक वेळी आपल्या वकिलांद्वारे एनसीबी आपली भूमिका बदलते. त्यांचा प्रयत्न असतो की लोकांना जास्त काल जेलमध्ये कसं ठेवण्यात येईल. लोकांच्या मनात भीती कशी निर्माण करता येईल. ज्यांनी हे फर्जी प्रकरण बनवलं त्यांच्याविरोधात आम्ही कोर्टात जाऊ, जे पुरावे आहेत ते सादर करु, असं मलिक म्हणाले.

समीर वानखेडेंचा मलिकांचा इशारा

त्याचबरोबर योगायोग म्हणावा लागेल की, ज्या अधिकाऱ्यांना यांना जेलमध्ये टाकलं. तोच अधिकारी आज जेलमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी हायकोर्टात गेला. महाराष्ट्र पोलीस या प्रकरणी जो तपास करत आहे तो तपास सीबीआय कडून करण्यात यावा अशी मागणी त्याने केलीय. मुंबई पोलिसांनी सांगितलं की त्यांना अटक करण्यापूर्वी 72 तासांची नोटीस दिली जाईल. तुरुंगात टाकणारा आज तुरुंगात जाण्याला घाबरतोय. मला वाटतं की जो फर्जीवाडा त्यांनी केलाय तो आता समोर येत आहे, अशी टीकाही मलिक यांनी केलीय. इतकंच नाही तर मलिक यांनी एक ट्विट करुन ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाचा दिलासा!

दरम्यान, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय. कुठल्याही प्रकारचा एफआयर दाखल करण्यापूर्वी किंवा अटकेची कारवाई करण्यापूर्वी तीन दिवस आधी वानखेडे यांना नोटीस दिली जावी. समीर वानखेडे यांच्यावर तूर्तास कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालायाने राज्य सरकारला दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर वानखेडे यांच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

आम्ही कुठल्याही परिस्थितीत, कोणत्याही एजन्सीसमोर चौकशीसाठी हजर होण्यास तयार आहोत. महाराष्ट्र सरकारकडून आमच्याविरोधात एक मोहीम राबवण्यात येत आहे आणि त्या मोहिमेअंतर्गतच एफआयआर दाखल न करताच एक एसआयटी स्थापन करण्यात आली आहे, अशी भूमिका समीर वानखेडे यांच्या वकिलाने हायकोर्टात मांडली. राज्य सरकारकडूनही आपली भूमिका मांडण्यात आली. सुमारे अर्धा तास चाललेल्या सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना दिलासा दिला आहे.

इतर बातम्या :

Aryan Khan : आरोपींना जामीनावर सोडलं तर साक्षी-पुराव्यांविषयी छेडछाड करु शकतात, एनसीबीच्या वकिलांचा जामीनाला तीव्र विरोध

‘समीर वानखेडेंना एकाकी पडू देऊ नका, मविआतील नेत्यांच्या घोटाळ्यावरुनही लक्ष हटायला नको’, भाजप नेत्यांना दिल्लीतून आदेश?

Nawab Malik’s warning to Sameer Wankhede after Aryan Khan was granted bail

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.