देशातील नागरिकांच्या बाबतीत कुठलाही भेदभाव होऊ नये, प्रत्येकाला समान वागणूक मिळावी; राष्ट्रवादीचा संकल्प

या देशात प्रत्येक नागरीकांना समान वागणूक मिळाली पाहिजे. त्यांच्या बाबतीत कुठलाही भेदभाव होऊ नये, हा संकल्प घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस काम करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

देशातील नागरिकांच्या बाबतीत कुठलाही भेदभाव होऊ नये, प्रत्येकाला समान वागणूक मिळावी; राष्ट्रवादीचा संकल्प
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 4:06 PM

मुंबई : या देशात प्रत्येक नागरीकांना समान वागणूक मिळाली पाहिजे. त्यांच्या बाबतीत कुठलाही भेदभाव होऊ नये, हा संकल्प घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस काम करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते, मुंबई अध्यक्ष आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. (Nawab Malik says There should be no discrimination in citizens of India, everyone should be treated equally)

आज ऑगस्ट क्रांती मैदानात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हुतात्म्यांना व ऑगस्ट क्रांती लढ्यात भाग घेतला त्या सर्वांना अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि पक्षाचे मुंबई पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोना काळातही ऑगस्ट क्रांतीची मशाल लोकांच्या मनात जागवली पाहिजे, हा उद्देश ठेवून आजचा कार्यक्रम करण्यात आला. देशासमोर आज अनेक आव्हाने आहेत, त्यात लोकांमध्ये जी तेढ निर्माण केली जात आहे, त्यातून देशाला सावरणे महत्वाचे आव्हान असणार आहे, असे नवाब मलिक म्हणाले.

आम्ही सगळे भारतीय एकजुटीने या देशाला बलशाली बनवण्याचा संकल्प करुन पुढील वर्षे काम करणार असल्याचेही नवाब मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाजप नेते मोदींचंसुद्धा ऐकत नाहीत : नवाब मलिक

कोरोनाचे संकट टाळण्यासाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिका घेत आहेत. मात्र याला विरोध करुन भाजप नेते मोदींचे पण ऐकत नाहीत, हे सिद्ध होत आहे. हे जनहितासाठी की मतासाठी सुरु आहे याचं उत्तर तेच देऊ शकतात, असा टोला अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे.

भाजपचे नेते लोकल ट्रेन सर्वसाधारण लोकांसाठी सुरू व्हावी म्हणून व मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सणासुदीला गर्दी होणार असल्याने चिंतेत आहेत. त्यांनी त्याचपध्दतीने काळजी घेण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येईल तसतशी अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे अगोदरच सांगितले आहे. मात्र याउलट भाजप नेते वागत असून मंदिरे उघडण्यासाठी व लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी आंदोलने करत आहेत, या दुटप्पी भूमिकेबद्दल नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सुशांतसिंग प्रकरण महाराष्ट्राला बदनाम करण्याचा कट : मलिक

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार निशाना साधला आहे. सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये ही हत्या की आत्महत्या होती हे सीबीआयने एक वर्ष झाले तरी स्पष्ट केले नाही. याचा अर्थ महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयने ताब्यात घेऊन आज एक वर्ष पूर्ण झाले आहे मात्र अजूनही यामध्ये सीबीआयने कोणताच खुलासा केला नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. एखादी घटना घडली की त्या – त्या राज्यात तपास राहतो मात्र सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात बिहार सरकारने त्यांच्या हद्दीत हत्येचा गुन्हा दाखल करुन प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी दिले होते. सीबीआय एक वर्ष या प्रकरणाचा तपास करतेय आणि अजून ही हत्या की आत्महत्या हे सांगू शकलेली नाही, असे मलिक म्हणाले. बिहार निवडणुकीत राजकीय फायदा उठवण्यासाठीच सुशांतप्रकरण रंगवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

इतर बातम्या

VIDEO: शिवसेना-भाजपची युती होणार की नाही? शिवसेना खासदारानं इनसाईड स्टोरी जगजाहीर केली, बघा काय म्हणाले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘या’ निर्णयाचं मनसेकडून पहिल्यांदाच जाहीर स्वागत; काय आहे मनसेचं ट्विट?

पेगाससद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा, लोकशाही वाचवण्यासाठी देश एकवटल्याशिवाय राहणार नाही: जयंत पाटील

(Nawab Malik says There should be no discrimination in citizens of India, everyone should be treated equally)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.