AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar: सुनील तटकरे, प्रफुल पटेलांविषयी सर्वात मोठा गौप्यस्फोट…. राष्ट्रवादीतील कोण कोण भाजपच्या वाटेवर…रोहित पवारांच्या दाव्याने एकच खळबळ

Rohit Pawar on Sunil Tatkare-Praful Patel: राज्याच्या राजकारणात काही वेगवान घडामोडी घडल्याने मोठा राजकीय भूकंप होणार असा अंदाज वर्तवला जात आहेत. त्यातच अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्यकारणीतील नेते प्रफुल पटेल यांच्याविषयी आमदार रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Rohit Pawar: सुनील तटकरे, प्रफुल पटेलांविषयी सर्वात मोठा गौप्यस्फोट.... राष्ट्रवादीतील कोण कोण भाजपच्या वाटेवर...रोहित पवारांच्या दाव्याने एकच खळबळ
रोहित पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेलImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 13, 2026 | 12:30 PM
Share

Rohit Pawar on Sunil Tatkare-Praful Patel: अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. या वेगवान घडामोडी घडत असतानाच आज आमदार रोहित पवार यांनी मोठा बॉम्ब टाकला. राष्ट्रीय कार्यकारणीतील नेते प्रफुल पटेल आणि तटकरे यांच्याविषयी त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. रोहित पवार यांच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. राज्याच्या राजकारणात भूकंप येणार का? अशी चर्चा होत आहे.

तटकरे, पटेल यांच्यासह 22 जण भाजपच्या वाटेवर?

सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार आणि तिथून विधानसभेची निवडणूक लढवणार असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला. त्यांच्या पक्षात काय सुरू आहे हे त्यांचा विषय आहे. पण त्या पक्षात अनेक नेते आहेत. कुणाचे नाव घेतले नाही आणि त्यामुळे कोणी दुखावत असेल. सकाळी धडासी निर्णय आणि नंतर ट्वीट करून त्यात बदल करू असे म्हटल्या जात असेल तर हा त्या पक्षाचा विषय असल्याचे रोहित पवार यांनी अजित पवार राष्ट्रवादीतील घाडमोडींवर म्हटले आहे. त्याचवेळी तटकरे, पटेल आणि 22 आमदार हे भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याचा दावा त्यांनी केला.

सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे अस्वस्थ आहेत चर्चा नाही. ते खरं आहे. पक्षांने त्यांना काढलं आहे. त्यांना डिमोट केलं आहेय सुनील शेळके यांना काय भविष्य कळत का ? तुम्ही भाजप सोडून या आम्ही स्वागत करू. दोन राष्ट्रवादी रोहित पवार यांना एकत्र नको आहे त्यावर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली. अजित दादांना न्याय मिळण्यासाठी आवाज उठवा आधी. उगीच डोळ्यात पाणी आणून काय होणार नाही, असा टोला त्यांनी शेळके यांना लगावला.

तटकरेना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा

आमचा पक्ष भाजपसोबत विलीन होणार नाही असे रोहित पवार म्हणाले. त्यामुळे त्यांनी पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या मुद्दावर भाष्य केले. सुनील तटकरे हे काल शरद पवार यांना भेटले. त्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. तीन वर्षानंतर तटकरे हे पवारांना भेटल्याचे म्हटले जात आहे. या भेटीवर रोहित पवार यांनी भाष्य केले. तटकरे यांना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा. तटकरेंना त्यांच्या अध्यक्षांना काही मॅसेज द्यायचा असेल असे भाष्यही रोहित पवारांनी केले.

आमच्या पक्षाविषयी कोणीही भाष्य करण्याची गरज नाही

आमच्या पक्षाबाबत कोणीही भविष्यकाराने भविष्य़वाणी करायची गरज नाही. आपल्या पक्षात काय चाललं आहे बघा. सुनेत्रा पवारांची साथ सोडणार नाही, आम्ही अजितदादांना मानणारे आहोत असे वक्तव्य आमदार अनिल पाटील यांनी रोहित पवार यांच्या विधानावर केले. मीडियात बातम्या पेरल्या जातायत, तटकरे, पटेल नाराज नाही. तटकरे, पटेल नाराज असतील तर त्यांनी बोलून दाखवावं. आसाम, गुवाहटीला सुनेत्रा वहिनींसोबत त्यांचा एकत्र पवार, नाराजीचं कारणच नाही. सुनेत्रा पवारांनी एक्स पोस्ट करुन सांगितलेले आहे. मुख्यमंत्रीही आमच्या आमदारांना व्यवस्थित न्याय देण्याचा प्रयत्न करतात. महायुतीचा आकडा २३४ वरुन २४० वर पोहचला. त्यांच्याकडे जागा नसेल तर आम्ही त्यांच्या पक्षातल्या लोकांना आमच्याकडे घेऊ असा टोला लगावत रोहित पवारांचं भविष्य एकदिवस खोटं ठरेल, असा दावा अनिल पाटील यांनी केला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?