AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाजपचं मुख्यालय कोणत्या जमिनीवर आहे?’ श्वेतपत्रिका काढा, काँग्रेसचा बॉम्बगोळा, हर्षवर्धन सपकाळांनी फोडला आरोपांचा पोळा

Harshavardhan Sapkal Big Statement : पार्थ पवार यांच्या कंपनीकडून झालेल्या जमीन व्यवहार प्रकरणाने सरकारच कोंडीत सापडल्या सारखं झालं आहे. त्यातही दिवसागणिक नवनवीन खुलासे होत असल्याने सस्पेन्स वाढला आहे. त्यात आता काँग्रेसने मोठा बॉम्बगोळा टाकला आहे.

'भाजपचं मुख्यालय कोणत्या जमिनीवर आहे?' श्वेतपत्रिका काढा, काँग्रेसचा बॉम्बगोळा, हर्षवर्धन सपकाळांनी फोडला आरोपांचा पोळा
हर्षवर्धन सपकाळ, अजित पवार, देवेंद्र फडणवीस
| Updated on: Nov 09, 2025 | 3:05 PM
Share

Congress State President on BJP : पुण्यातील मुंढवा जमीन खरेदी प्रकरणासोबतच दुसरा ही जमीन घोटाळा समोर आल्याने आणि त्यातील आरोपी हे सारखेच असल्याने मोठा गदारोळ उठला आहे. पार्थ पवार यांची कंपनी अमेडियामार्फत व्यवहार झाल्याने राजकारण तापले आहे. विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यातही या जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिवसागणिक नवनवीन खुलासे होत असल्याने सस्पेन्स वाढला आहे. त्यात आता काँग्रेसने भाजपवरच जमीन व्यवहाराप्रकरणी मोठा बॉम्बगोळा टाकला आहे.

आता सरकारच बरखास्त करण्याची वेळ

याप्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्याच दिवशी राजीनामा द्यायला हवा होता. पार्थ पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गुन्हा दाखल झालेल्यांना सरकारनेच देशातून पळून लावल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ना खाऊंगा ना खाने दुंगा ही भूमिका भाजप सातत्याने मांडत आहे. मात्र आता त्यांनी हमभी खाऐंगे और तुमभी खाओ अशी भूमिका घेतली आहे. त्यांनी सरकारच बरखास्त करण्याची वेळ आल्याचे वक्तव्य केले.

भाजपचं कार्यालय कोणत्या जमिनीवर?

भाजपमध्ये थोडीबहूत नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी अजितदादांना मंत्रिमंडळातून तात्काळ बरखास्त करावं. या संपूर्ण संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावेत. इतकंच नाही तर भाजपचं कार्यालय कोणत्या जमिनीवर आहे. याची श्वेत पत्रिका सरकारने तात्काळ काढावी अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. चुकीला चूक म्हणा आणि पार्थला अटक करा. दादांचा राजीनामा घ्या अशी मागणी त्यांनी केली. हे बेशरम सरकार असल्याचे ते म्हणाले.

तर पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सपकाळांनी केला. तर ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यांना विजय माल्ल्या पॅटर्नप्रमाणे या सरकारने देशातून पळवून लावले आहे, असा गंभीर आरोपही बंटीदादा सपकाळ यांनी केला.

तर बारामतीत नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजितदादांनी या सर्व व्यवहारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एक रुपयाही न घेता केलेला हा सर्व व्यवहार अधिकाऱ्याने कसा नोंदवून घेतला असा सवाल करत त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे बोट दाखवले. तर निवडणुका आल्या की आपल्याला बदनाम करण्यासाठी असे काही तरी बाहेर काढले जाते असा आरोपही त्यांनी केला. त्यांचा नेमका इशारा कुणाकडे होता हे मात्र स्पष्ट झाले नाही.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.