AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

35 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत प्रथमच मते मागणार पीयूष गोयल, लोकलमधून प्रवास करत…

Mumbai lok sabha election 2024 | उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून पीयूष गोयल यांना भाजपने उमदेवारी दिली आहे. तब्बल 35 वर्षांनी पीयूष गोयल निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. त्यांनी लोकलमधून प्रवास करत लोकांशी संवाद साधला.

35 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत प्रथमच मते मागणार पीयूष गोयल, लोकलमधून प्रवास करत...
मुंबई लोकलमधून प्रवास करताना पीयूष गोयल आणि आशीष शेलार
| Updated on: Mar 15, 2024 | 11:37 AM
Share

मुंबई | 15 मार्च 2024 : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून पीयूष गोयल यांना उमदेवारी जाहीर केली आहे. तब्बल 35 वर्षांनी पीयूष गोयल निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. त्यांनी आपल्या प्रचारास सुरुवात केली आहे. त्यासाठी अगदी लोकलमधून प्रवास करत आहेत. दादर ते बोरिवली असा प्रवास करुन त्यांनी लोकांशी संपर्क साधला. पीयूष गोयल यांचे आई-वडील भाजपमध्येच होते. परंतु त्यांनी गेल्या 35 वर्षांत निवडणूक लढवली नव्हती. आता भाजपने मोदी सरकारमधील नवरत्नांना राज्यसभेऐवजी लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्यामुळे गोयल यांनाही उमेदवारी मिळाली आहे.

पीयूष गोयल यांचा लोकल प्रवास

उमेदवारी जाहीर होताच पीयूष गोयल यांनी आपल्या प्रचारास सुरुवात केली आहे. 14 मार्च रोजी पीयूष गोयल यांनी मुंबई लोकलमधून प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार होते. या प्रवासात त्यांनी लोकांशी संवाद साधला. यासंदर्भात आशीष शेलार यांनी ट्विट केले आहे. आता उत्तर मुंबईमधील 17 लाख मतदार पीयूष गोयल त्यांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत.

आई-वडील राजकारणात

पीयूष गोयल यांचे वडील वेदप्रकाश दोन दशके राजकारणात होते. अटलबिहारी सरकारमध्ये ते मंत्री होते. भाजपचे ते राष्‍ट्रीय कोषाध्यक्ष होते. त्यांची आई चंद्रकांता गोयल आमदार होती. घरातून राजकीय पार्श्वभूमी मिळाल्यानंतर पीयूष गोयल 1990 च्या दशकात भाजपाशी जोडले गेले. पक्षात विविध पदावर काम करत त्यांना 2010 रोजी राज्यसभेची संधी मिळाली. सलग तीन वेळा ते राज्यसभेतून खासदार झाले. भाजपमध्येच नाही तर विरोधी पक्षात त्यांचे चांगले संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतील नेते ते आहेत.

एलईडी बल्बचे यश

2014 से 2017 मध्ये पीयूष गोयल रिन्‍यूबल एनर्जी मिनिस्‍टर होते. त्यावेळी त्यांनी एलईडी बल्ब वितरण योजना आणली. ते वाणिज्य मंत्री असताना भारताने संयुक्त अरब अमीरात (युएई) सोबत खुले व्यापार धोरण सुरु केले. ‘मेक इन इंडिया’ साठी त्यांनी मोठे काम केले आहे. 2014 मध्ये पीयूष गोयल यांनीच ‘नमो टी’ मोहीम सुरु केली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसामान्यांपर्यंत पोहचले.

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.