PMC बँकेत 90 लाख रुपये, खातेदाराचा हृदयविकाराने मृत्यू

Nupur Chilkulwar

|

Updated on: Oct 15, 2019 | 11:05 AM

संजय गुलाटी मुंबई येथे पीएमसी बँकेविरोधात प्रदर्शन केल्यानंतर घरी परतले. घरी आल्यानंतर अचानक त्यांना हृदयविकाराचा धक्का आला (PMC Bank customer died). त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

PMC बँकेत 90 लाख रुपये, खातेदाराचा हृदयविकाराने मृत्यू

मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक म्हणजेच पीएमसी बँकेत पैसे अडकल्याचा धसका घेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे (PMC Bank customer died). पीएमसी बँकेचे खातेदार संजय गुलाटी यांना बँकेत पैसे अडकल्याच्या चिंतेने हृदयविकाराचा धक्का आला. संजय गुलाटी मुंबई येथे पीएमसी बँकेविरोधात प्रदर्शन केल्यानंतर घरी परतले. घरी आल्यानंतर अचानक त्यांना हृदयविकाराचा धक्का आला (PMC Bank customer died). त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

संजय गुलाटी हे 51 वर्षांचे होते. पीएमसी बँकेत त्यांचे 90 लाख रुपये जमा होते (PMC Bank Scam). वृत्तानुसार, गुलाटी यांनी जेट एअरवेजमधील नोकरी गमावली होती. त्यानंतर आता पीएमसी बँक घोटळ्यामुळे त्यांनी आयुष्यभर कमावलेली सर्व संपत्ती फसली होती. गुलाटी यांना हा धक्का सहन झाला नाही आणि त्यांचा मृत्यू झाला.

गुलाटी यांच्या मृत्यूसाठी PMC जबाबदार

संजय गुलाटी यांना व्यवसायासाठी पैशांची गरज होती, त्यामुळे ते गेल्या अनेक दिवसांपासून चिंतीत होते. अनेक दिवसांपासून त्यांना तोटा सहन करावा लागत होता. ते नैराश्यात होते. त्यांच्या मृत्यूसाठी पीएमसी बँक जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

भारतीय रिजर्व्ह बँकेने पीएमसी बँकेच्या बचत खातेदारांसाठी सहा महिन्यांमध्ये पैसे काढण्याची मर्यादा 25,000 रुपयांनी वाढवून 40,000 रुपये केली आहे. आतापर्यंत तिसऱ्यांदा रिजर्व्ह बँकेने पीएमसी खातेदारकांची पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे.

संबंधित बातम्या :

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी बडे मासे सापडले, वाधवान बिल्डर्सला अटक, 3500 कोटींची संपत्ती जप्त

पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ

पीएमसी बँकेवर निर्बंध, प्रसिद्ध अभिनेत्रीवर सोनं विकण्याची वेळ

पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध, वयोवृद्ध दाम्पत्य औषधालाही महाग

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI