वीज कंपन्यातील कर्मचाऱ्यांना मिळणार अत्याधुनिक प्रशिक्षण; नागपूरमध्ये असणार मुख्यालय, ऊर्जा मंत्र्यांनी सांगितला नवा प्लॅन

विज क्षेत्रामध्ये येणाऱ्या नव्या बदलांस तसेच  आव्हानांना सामोरे जाण्याकरीता तिन्ही वीज कंपन्यांतील मनुष्यबळाला अद्ययावत असे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी माहिती दिली.

वीज कंपन्यातील कर्मचाऱ्यांना मिळणार अत्याधुनिक प्रशिक्षण; नागपूरमध्ये असणार मुख्यालय, ऊर्जा मंत्र्यांनी सांगितला नवा प्लॅन
नितीन राऊत, ऊर्जा मंत्री
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 8:40 PM

मुंबई : विज क्षेत्रामध्ये येणाऱ्या नव्या बदलांस तसेच  आव्हानांना सामोरे जाण्याकरीता तिन्ही वीज कंपन्यांतील मनुष्यबळाला अद्ययावत व प्रशिक्षित करण्यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षण, संशोधन व विकास केंद्र निर्माण करण्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी मानव संसाधन विभागाला आदेश दिले आहेत. राज्याची उप राजधानी नागपूर (NAGPUR) येथे एक अद्ययावत आणि सुसज्ज असे प्रशिक्षण तथा संशोधन व विकास केंद्र निर्माण करावे असे निर्देश त्यांनी नुकत्याच झालेल्या मानव संसाधन विभागाच्या (Department of Human Resources) आढावा बैठकीमध्ये दिले. यात महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांचे संचालक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ऊर्जा विभागांतर्गत एकूण 85 हजार अभियंते, अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून, त्यांच्या गुणात्मक विकासाकरीता अद्ययावत तसेच सर्व सोईंनी सुसज्ज असे प्रशिक्षण तथा संशोधन व विकास केंद्र निर्माण करून, त्यांच्या सेवाकाळात नव नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन राज्याच्या व त्या अनुषंगाने देशाच्या विकासात हातभार लागेल असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

ऊर्जा मंत्र्यांकडून वीज कंपन्यांच्या कामांचा आढावा

ऊर्जा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांच्या सर्वांगीण विकास होण्याकरता त्यांना अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वित्त व लेखा विषयात पारंगत करण्याची गरज असल्याचे यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. या बैठीमध्ये त्यांनी या तीनही कंपन्यांच्या सद्यास्थितीचा आढावा घेतला. तसेच कार्यक्षमता वाढवण्याचा दृष्टीने काही मार्गदर्शन देखील केले.  ” कंपनीमधील प्रशिक्षणाची व्यवस्था ही जागतिक दर्जाची असावी. सध्याची प्रशिक्षण व्यवस्था जागतिक दर्जाची करण्याकरीता त्या व्यवस्थेचा अभ्यास करून व कालबध्द कार्यक्रम राबवून यथायोग्य प्रशिक्षण व्यवस्था ऊर्जा विभागाकरीता तयार करायला हवी. आवश्यकतेनुसार या प्रशिक्षण व्यवस्थेअंतर्गत देशातील तसेच परदेशातील अभियांत्रिकी, व्यवस्थापन तसेच वित्त व लेखा विषयात काम करणा-या नामांकित संस्थांबरोबर करार करण्यात यावा व पायाभूत तसेच विशेषज्ञ स्वरूपाचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत,” असेही डॉ.राऊत यांनी यावेळी म्हटले.

प्रशिक्षणासाठी कर्मचाऱ्यांना प्रेहत्साहन द्यावे

प्रशिक्षण घेण्याकरीता कर्मचा-यांना प्रोत्साहित करण्यासाठी कंपनीने आपल्या स्तरावर योजना आखाव्यात किंबहुना, नियतकालीक प्रशिक्षण घेण्याची तरतूद कंपनी स्तरावर करावी. प्रशिक्षण न घेणा-या कर्मचा-यांच्या कार्यमुल्यांकनात ह्या संदर्भात विपरीत नोंद घेण्याची यंत्रणा सुद्धा कार्यान्वित करावी, असे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले. ऊर्जा क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अशाप्रकारे तयार करण्यात यावे की, ते पुढील पदोन्नती व सरळसेवा भरतीद्वारे वरिष्ठ पदावर नियुक्त झाल्यानंतर त्या पदाच्या जबाबदा-या सक्षमपणे पार पाडतील असे राऊत यांनी यावेळी म्हटले.

संंबंधित  बातम्या

परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन?; दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात अजित पवारांचे मोठे वक्तव्य

मुख्यमंत्री आदित्य ठाकरे… अजित पवारांनी केला खुलासा, म्हणाले…

वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक, रविवारी केंद्र सरकारविरोधात राज्यभरात आंदोलन, मोदींना पाठवणार सिलिंडर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.