संभाजी ब्रिगेड म्हणजे राष्ट्रवादीचं पिल्लू ही आमची हेटाळणी, आता फक्त भाजपचा पर्याय, पुरुषोत्तम खेडेकरांची पहिली प्रतिक्रिया

राजकारणात सध्या युती आघाड्यांचा काळ आहे, हे फक्त आपल्या राज्यात आहे, असं नाहीय. तर देशभरातही आहे. राजकारणात तशी गरज निर्माण झाली आहे, असं पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले आहेत.

संभाजी ब्रिगेड म्हणजे राष्ट्रवादीचं पिल्लू ही आमची हेटाळणी, आता फक्त भाजपचा पर्याय, पुरुषोत्तम खेडेकरांची पहिली प्रतिक्रिया
पुरुषोत्तम खेडेकर
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 11:59 AM

मुंबई : मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडने भाजपशी युती करावी, किंबहुना सध्याची राजकारणाची ती गरज असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच भूकंप झाला आहे. गेले अनेक वर्ष भाजप आणि आरएसएसच्या विरोधात रान उठवणाऱ्या खेडेकरांनी आता थेट संभाजी ब्रिगेडला भाजपशी युती करण्याचा सल्ला दिला आहे. मराठा सेवा संघाच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त मराठा मार्ग मासिकात लिहिलेल्या लेखात पुरुषोत्तम खेडेकर यांनी ही भूमिका मांडली. तर संभाजी ब्रिगेड म्हणजे राष्ट्रवादीचं पिल्लू आहे अशा प्रकारे अनेक वर्षे आमची हेटाळणी देखील झाली. पण आता वेळ आलीय ती काहीतरी भूमिका घ्यायची. त्यानुसार संभाजी ब्रिगेडने भाजपशी युती करण्याचा विचार करावा, असं खेडेकर म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपविरोधी भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले पुरुषोत्तम खेडेकर, यांच्या लेखाने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांनी आगामी काळात राजकीय वाटचाल करताना भारतीय जनता पक्षासोबत युती का करावी लागेल, याचं स्पष्टीकरण देखील दिलं आहे. राजकारणात सध्या युती आघाड्यांचा काळ आहे, हे फक्त आपल्या राज्यात आहे, असं नाहीय. तर देशभरातही आहे, असंही ते म्हणाले आहेत.

पुरुषोत्तम खेडेकरांनी भूमिका बदलण्यामागे काय स्पष्टीकरण दिलंय?

माझ्या लेखापाठीमागे ही भूमिका आहे की, राजकारण हे राजकारणासारखं व्हावं. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सत्ता मिळविण्यासाठी आम्ही स्वबळावर लढलो, पण मोजक्या स्थानिक स्वराज्य संस्था वगळता लोकसभा विधानसभेत आम्हाला यश मिळालं नाही. राजकारणात सध्या युती आघाड्यांचा काळ आहे, हे फक्त आपल्या राज्यात आहे, असं नाहीय. तर देशभरातही आहे. राजकारणात तशी गरज निर्माण झाली आहे.

काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा पर्याय आमच्यासमोर जवळपास नाहीच आहे. आता भाजपचा पर्याय उरला आहे. राजकारण हे राजकारणासारखं करण्यासाठी आता एकमेव भाजपचा पर्याय दिसतो आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तो पर्याय तपासून पाहावा. दोघांनीही चर्चेअंती अजेंडा ठरवावा आणि पुढचं राजकारण करावं, असं पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले.

तुमची भूमिका राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी मिळतीजुळती आहे, मग भाजपची सलगी करण्याची तयारी का? या प्रश्नावर पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, राजकारणात काम करत असताना अनेक वेळा अनेक पक्षांशी विचारधारा जुळते. राजकारणामध्ये राजसत्ता-लोककल्याण हे सगळ्यांचंच आहे. अनेकदा संभाजी ब्रिगेड हे राष्ट्रवादीचं पिल्लू आहे, अशी हेटाळणी झाली. खरं तर हा आमच्यावरचा अन्याय आहे. पण स्वतंत्रपणे आम्हाला आमची विचारधारा आहे, असंही पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले.

खेडेकरांनी ‘मराठा मार्ग’ मासिकाच्या लेखात नेमकं काय म्हटलंय?

पुरुषोत्तम खेडेकर यांनी आगामी काळात राजकीय वाटचाल करताना भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याची भूमिका मांडली. मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘मराठा मार्ग’ या मासिकामध्ये संपादकीय लेख लिहिला आहे. या लेखामध्ये भाजपसोबतच्या युतीची भूमिका मांडली.

भारतीय जनता पक्ष हा अर्थातच आरएसएसच्या नेतृत्त्वातील पक्ष आहे. विशेष म्हणजे मराठा सेवा संघाची संपूर्ण मांडणी ही आरएसएस विचारधारेच्या पूर्णपणे विरोधात आहे. मात्र तरीही पुरुषोत्तम खेडेकर यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा विचार मांडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

(Purushottam Khedekar Firts Comment on Maratha Marg Editorial Sambhaji Brigade Should Alliance BJP)

हे ही वाचा :

‘भाजपशी युती हाच पर्याय’, संभाजी ब्रिगेडच्या पुरुषोत्तम खेडेकरांची भूमिका 360 अंशात बदलली?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.