Auto Strike: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात रिक्षा चालक आक्रमक, प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी करणार रिक्षा बंद आंदोलन
रिक्षाचालक या शब्दावरुन गेल्या काही दिवसांत चांगलेच राजकारण रंगले. या सगळ्यात रिक्षाचालकांचे प्रश्न मात्र ठाकरे सरकारच्या काळापासून प्रलंबित असल्याचे दिसते आहे. त्यातूनच हा बंदचा इशारा देण्यात आला आहे.

ठाणे – भाडे दरवाढ (Fare hike)लागू करा, यासह कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाच्या विविध मागण्याांसाठी एक ऑगस्ट रोजी रिक्षा-टॅक्सीवाले (Auto-Taxi Drivers)संपावर (Strike)जाणार आहे्त. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात हा संपाचा इशारा राज्य सरकारला देण्यात आलेला आहे. रिक्षा-टॅक्सीवाल्यांचे अनेक प्रश्नांबाबत सरकारला आणि आधीच्या सरकारला देखील कळवले होते, मात्र अजूनही कुठलाच ठोस निर्णय न घेतल्यामुळे अखेर संपाचे हत्यार रिक्षा-टॅक्सी युनियनने उपासले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील रिक्षाचालक होते. त्यानंतर वाटचाल करत आज शिंदे मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचलेले आहेत. त्यामुळे नक्कीच कुठेतरी रिक्षाचालकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा युनियनने व्यक्त केली आहे. तोडगा निघाला नाही तर संप पुढेही सुरू राहणार असल्याचे युनियनच्या वतीने सांगण्यात आले आहे.
कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघ यांच्या कोणत्या आहेत मागण्या?
- ऑटो रिक्षा-टॅक्सीची प्रलंभित भाडे दरवाढ बिनाविलंब लागू करा.
- ऑटो रिक्षा-टॅक्सी परवाने वाटप बंद करा किंवा १० ते १५ वर्षे स्थगिती द्या.
- नव्या मोटार वाहन कायद्यानुसार ई-चलनाव्दारे दंड आकारणी (वाहतूक पोलीसांकडून मोबाईल फोटो वारे होणारी वसुली बंद करा.
- ऑटो रिक्षा-टॅक्सी करीता स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून माथाडी कामगारांच्या धर्तीवर रिक्षा-टॅक्सी व्यावसायिकांना सुविधा द्या.
- थर्ड पार्टी विमा रक्कम (इन्शुरन्स) कमी करा.
- रिक्षा-टॅक्सी पासिंग
- प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आर.टी.ओ.) वाहनांची ब्रेक टेस्ट तपासणी ट्रक निर्माण करा.
- चोरटी प्रवासी वाहतुक करणाऱ्या खाजगी वाहनांना प्रतिबंध करा.
- ऑटो रिक्षा-टॅक्सी स्टॅण्ड बसवुन द्या व नविन रिक्षा स्टॅण्ड का परवानगी द्या
- ऑटो रिक्षा-टॅक्सी या वाहनांची वयोमर्यादा रद्द करा.
- ऑटो रिक्षा-टॅक्सी चालकांना शेतकऱ्यांप्रमाणे संपूर्ण कर्ज माफी द्या.
- ऑटो रिक्षा-टॅक्सीना कर्ज पुरवठा करणाऱ्या बजाज फायनान्स कंपनीच्या मनमानी कारभार करणाऱ्या संस्था चालकांवर कायदेशीर कारवाई करा.
- मनमानी कारभार करणारे रिक्षा बितरक (डिलर) यांचेवर कायदेशीर कारवाई करा.
- शासकीय-निमशासकीय व खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे परवाना रद्द करा.
रिक्षावरुन राजकारण मात्र प्रश्न प्रलंबितच
रिक्षाचालक या शब्दावरुन गेल्या काही दिवसांत चांगलेच राजकारण रंगले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंगे यांच्यावर रिक्षाचालक म्हणून टीकाही शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्यानंतर ठाणे शहरातील रिक्षाचालकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबाही जाहीर केला होता. या सगळ्यात रिक्षाचालकांचे प्रश्न मात्र ठाकरे सरकारच्या काळापासून प्रलंबित असल्याचे दिसते आहे. त्यातूनच हा बंदचा इशारा देण्यात आला आहे.
